💥राज्य सरकार कोसळताच बच्चू कडूंना रस्ते घोटाळा प्रकरणात क्लीन चिट..!


💥तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता💥

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात वातावरण तापले होते. यातच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. अखेर बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रपदाचा राजीनामा दिला. एकीकडे राज्यातील सरकार कोसळले तर दुसरीकडे प्रहार पक्षाचे नेते बंडखोर आमदार बच्चू कडू यांना देखील रस्ते घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे.

तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी 95 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. मात्र राज्यातील सत्ताधारी पायउतार होताच या प्रकरणातून बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या प्रकरणाची फाईल पोलिसांनी बंद केली असून या संपूर्ण प्रकरणात पुरावे नसल्यानं प्रकरणच तथ्यहिन असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नेमके प्रकरण होते तरी काय? जाणून घ्या :  
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने रस्ते घोटाळ्याचा आरोप केला होता. अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या