💥उस्मानाबाद पोलिस अधिक्षक कार्यालयातील लाचखोर लिपीक १० हजार रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात....!


💥लाचखोर लिपीक एजाज अजीम शेख याने तक्रारदार महिला कर्मचाऱ्यास बदलीसाठी मागीतली होती लाच💥

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यरत लिपीकाने एका २७ वर्षीय तक्रारदार महिला कर्मचाऱ्यास बदलीसाठी १० हजार रुपयांच्या लाचेची दि.२१ जुन २०२२ रोजी मागणी करीत संबंधित महिलेचा विनयभंग देखील केला मागीतलेली १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना काल दि.२२ जुन २०२२ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष लाचखोर लिपीक एजाज अजीम शेख वय ४६ वर्षे यास ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात कनिष्ठ लिपीक वर्ग-३ या पदावर कार्यरत आरोपी आरोपी लोकसेवक एजाज अजीम शेख रा.उस्मानाबाद याने एका २७ वर्षीय महिला कर्मचाऱ्यास बदलीसाठी अर्ज केला असता वरिष्ठ लिपिक देसाई यांना सांगून बदली करून देण्यासाठी १० हजार रुपये लाच रक्कम यापूर्वी स्वीकारल्याचे मान्य करून तसेच सदर कामासाठी लोकसेवक कनिष्ठ लिपिक यांनी दि.२१ जुन २०२२ रोजी १० हजार रुपये लाचेची मागणी करून  दि.२२ जुन २०२२ रोजी १० हजार रुपये लाच रक्कम आलोसे एजाज अजीम शेख यांनी स्वतः पांचासमक्ष स्वीकारल्याने त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात ताब्यात घेतले आहे.

                 या कारवाईत सापळा अधिकारी म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरिक्षक अशोक हुलगे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे औरंगाबाद अप्पर पोलिस अधिक्षक विशाल खांबे,पोलिस उप अधिक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली असून यावेळी सापळा पथकातील पो.अ.शिधेश्र्वर तावसकर,विष्णु बेळे,विशाल डोके,अविनाश आचार्य लाच लुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी महत्वाची भुमिका बजावली...

 यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की त्यांच्याकडे कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

*अँन्टी करप्शन ब्यूरो, उस्मनाबाद*

02472222879

@टोल फ्री क्र.1064

----------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या