💥महातपुरीवासियांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध - सखाराम बोबडे पडेगावकर


💥आज शनिवारी महातपूरी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना बोबडे यांनी केले प्रतिपादन💥

गंगाखेड प्रतिनिधी

महातपुरी भागातील ग्रामस्थ,शेतकरी यांच्या वीज ,आरोग्य शिक्षण आदी शी निगडित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आम आदमी पार्टीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडे गावकर यांनी शनिवारी महातपूरी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना दिली.


गंगाखेड तालुक्यातील महातपुरी येथील धनगर गल्लीतील पोल गंजल्याने तो धोकादायक बनला आहे. वारा पावसात कधीही तो पोल पडून होणारा संभाव्य अपघात टाळण्यासाठी ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम वालवटे यांनी पुढाकार घेऊन  ग्रामस्थ व युवकांना एकत्र केले. सर्वांनी एकत्रित निर्णय घेऊन परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडे गावकर यांना शनिवारी महातपुरी येथे सकाळी आठ वाजता बोलावून घेतले.  त्यांच्या समोर  आपल्या व्यथा मांडल्या. गावातील धनगर गल्ली व चावडी जवळील असे दोन पोल धोकादायक असून कधीही ते पडून संभाव्य अपघात होऊ शकतो. हा अपघात टाळण्यासाठी पोल बदलणे आवश्यक आहे. धोकादायक पोल हटउन त्यां ठिकाणी नवीन पोल बसवण्यासाठी आपण महावितरण कंपनी कडे पाठपुरावा करावा असे साकडे महातपुरी वासीयांनी शनिवारी घातले. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर ,राजेश कांबळे , जोशी समाज संघटनेचे रामेश्वर भोळे आदींचा ग्रामस्थांनी सत्कारही केला. महावितरणच्या अधिकार्‍याकडे पाठपुरावा करून येत्या आठ दिवसात हा धोकादायक पोल हतवण्यात येईल अशी ग्वाही सखाराम बोबडे पडेगावकर यांनी ग्रामस्थांना दिली..त्यानंतर या धोकादायक पोल ची पाहणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमजद शेख, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाध्यक्ष शेख मुस्तफा, उपसरपंच उत्तमराव मुलगीर, ग्रामपंचायत सदस्य दीनानाथ घीसडे, गोविंद खटींग, सचिन खटींग, रामचंद्र खटींग, मुक्तिराम खटींग, गणपतराव खटींग, संजय भंडारे, कारभारी खटींग,पांडुरंग खटींग,गणेश खटींग, रामभाऊ खटींग ,केशवराव आळशे. सचिन श्रीपतराव खटींग, जानकीराम वाळवंटे सह ग्रामस्थ उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या