💥पाथरी येथील तुळजाभवानी अर्बन बँके तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप....!


💥या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे यांची प्रमुख उपस्थिती💥 

किरण घुंबरे पाटील

पाथरी (दि.१८ जुन २०२२) :- येथील तुळजाभवानी अर्बन बँकेने आपले सामाजिक दाईत्व जोपासत शहरालगत असलेल्या देवनांद्रा येथील प्राथमिक विद्यालयात शुक्रवार १७ जुन रोजी सकाळी १० वाजता इयत्ता १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहित्य किट चे वाटप केले.


या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे,केंद्रप्रमुख  टेंगसे, शाळेचे मुख्याध्यापक महिपाल, तुळजाभवानी अर्बन बँकेचे विभागीय अधिकारी अमोल बिडवे, शाखा व्यवस्थापक गणेश निरपणे,नितीन यादव सहशिक्षक हारकाळ आणि या शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमा साठी या शाळेतील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या