💥मंगरूळपीर येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगा तर्फे आयोजित विविध कार्यक्रम संपन्न...!


💥मानवी हक्कांचे सामान्य ज्ञान असणे प्रत्येक माणसाच्या जीवनात खूप महत्वाचे आहे - डॉ.संतोष बजाज

फुलचंद भगत

वाशिम : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.संतोष बजाज यांच्या दि. 15 जून 2022 रोजी तालुका मंगरुळपीर दौऱ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रथमच तालुक्याला भेट देऊन आले होते. 

                    यावेळी वाशिम जिल्हाध्यक्ष अश्विन विटकरे व अकोला जिल्हा मुख्य सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे शाल, श्रीफळ व पुष्प देऊन भव्य स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवात तालुक्यात वृक्षारोपणाने झाली.मानवाधिकाराची जबाबदारी पत्र देवून सोपविण्यात आली.यावेळी पदाधिकार्‍यांचीही नियुक्ती करण्यात आली.यानंतर तिसऱ्या सत्रात कार्यक्रमात उपस्थित सर्व अधिकारी व सदस्यांना मानवाधिकार कार्यशाळा व प्रशिक्षण देण्यात आले. चौथ्या सत्रात प्रश्न-उत्तर फेरी आणि लोक अदालतीचे आयोजन करून जनतेच्या आलेल्या समस्यांचे निरसन करण्यात आले, त्यानंतर भोलेनाथ वृद्धाश्रमात सदिच्छा अर्पण करून, आश्रमातील वृद्धांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले.या कार्यक्रमाला आकाश डाखोरे, देवानंद गायकवाड, प्रतिक वानखेडे, नितीन झामरे, सुशील मोरे, महेश मांगुळकर, राहुल भडांगे, नितेश हिमगिरे, गोविंद इंदोरा, अविनाश ठाकरे, विशाल दाते, राजेश वानखेडे, रुपेश रायते, मंगेश समर्थ, सुरज रोहनकर, रवि ठाकरे आदी अधिकारी व सदस्य उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या