💥परभणी तालुक्यातील मटकऱ्हाळा ते आनंदवाडी पर्यायी रस्त्याचे उद्घाटन.....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुढाकाराने जलसंपदा विभागाने आठ दिवसात केला मजबूत कालवा रस्ता💥

परभणी - तालुक्यातील मटकऱ्हाळा ते आनंदवाडी हा रस्ता बंद झाल्याने परिसरातील साठ ते सत्तर शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेती करणे अवघड झाले होते अनेक वेळा तहसील कार्यालयात तक्रार देऊन ही रस्ता झाला नाही. या रस्त्याला लागून निम्न दुधना कालवा असल्याने त्या कालव्या लगत मटकऱ्हाळा ते आनंदवाडी असा कालव्या लगतचा पर्यायी रस्ता तयार करून शेतकऱ्यांचा अनेक वर्षाचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती संबंधित शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या कडे लेखी स्वरूपात केली होती. या पत्राची तात्काळ दखल घेत जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकारी व सबंधित शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळासह माजलगाव कालवा क्रमांक दहा चे कार्यकारी अभियंता श्री. प्रसाद लांब यांची भेट घेऊन रस्ता तत्काळ करावा असे निवेदन दिले होते त्या नंतर श्री.लांब यांनी संबंधित कामाची पाहणी करून जलसंपदा विभागाच्या वतीने रस्त्याच्या कामाला तत्काळ सुरुवात केली.


साधारण दोन किलो मिटर अंतर असलेल्या मटकऱ्हाळा ते आनंदवाडी रस्त्याच्या मजबुतीकरनाचे काम युद्ध पातळीवर अवघ्या आठ दिवसात पूर्ण करण्यात आले व मटकऱ्हाळा येथील शेतकऱ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी रास्ता तयार करून देऊ हा शब्द प्रहार जनशक्ती पक्षाने पाळल्याने मटकऱ्हाळा येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री मा.ना. बच्चूभाऊ कडू व प्रहार जनशक्ती पक्ष परभणीचे आभार मानले आहेत.

आज या रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा मटकऱ्हाळा चे माजी चेअमन मुरलीधर गरुड, माजी सरपंच भागवत पाटील गरुड, शिवाजी टेलर गरुड व किशनराव गरुड या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, बोबडे टाकळी सर्कल प्रमुख ज्ञानोबा काळे, युवा आघाडी सर्कल प्रमुख सोपान हरकळ, शहर चिटणीस वैभव संघई, प्रहार शाखा प्रमुख उद्धव गरुड, माऊली गरुड, सुभाष गरुड, अशोक येडे, सतीश हरकळ, माजी चेअरमन सुरेश गरुड, रामराव गरुड, उद्घव गरुड, संजय गरूड, पांडुरंग गरूड, मोतीराम गरूड, संतोष गरूड, बंटी उर्फ आदित्य गरूड गरूड, नारायण गरूड, संदीप राऊत, बबन येडे, हनुमान गरूड, ओंकार गरूड, सतीश गरूड, भारत गरूड इत्यादी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या