💥....अन उदार मनाच्या खासदार संजय जाधव यांनी केला सरपंच बालाजी शिरगोळे यांचा केला हृदयस्पर्षी सत्कार...!


💥खासदार संजय जाधव यांनी केलेल्या सत्काराने अक्षरशः भारावले मौ.आडगावचे सरपंच शिरगोळे💥

परभणी (दि.०१ जुन २०२२) - परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचा आज बुधवार दि.०१ जुन २०२२ रोजी प्रगटदीन अर्थात वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा असल्याने जिल्ह्यातील असंख्य चाहते लोकप्रतिनिधी पदाधिकारी/कार्यकर्त्यांनी त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून सोशल मिडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


आपण ही आपल्या लोकप्रिय नेत्याला प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात या उद्देशाने पुर्णा तालुक्यातील मौ.आडगाव (आगलावे) येथील ग्रामपंचायतचे सरपंच बालाजीराव शिरगोळे हे आपल्या ग्रामपंचायत सदस्य तसेच कार्यकर्त्यांसह खासदार संजय जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी खा.जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बालाजी शिरगोळे हे सरपंच झाल्यानंतर प्रथमच आपल्या निवासस्थानी आल्याने उदार मनाच्या खासदारांनी सरपंच शिरगोळे यांना पुष्पहार घालून हृदयस्पर्षी सत्कार केला जिल्ह्याचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी तथा नेत्याने आपला यथोचित सत्कार केल्याने सरपंच बालाजी शिरगोळे अक्षरशः भारावून गेले व त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या