💥रोडवरील गिट्टी उखलूण पडल्याने या रस्त्यावर छोटे मोठे अपघात देखील होत आहेत💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा ते बोरखेडी पिनगाळे या तीन किलोमीटर रस्त्यावर अतिशय मोठ मोठे खड्डे पडले आहेत गेल्या दोन वर्षा पासून या रस्त्यावरील खड्डे बूजवले नाहीत काल झालेल्या पावसा मुळे या रस्त्यावरील खड्डात पाणी साचले होते खड्डात पाणी साचल्याने वाहन धारकांना खड्यातून गाड्या काढणे खुप कठीण झाले होते गेल्या दोन वर्षा पासून या रस्त्यावर खड्डे पडले आहेत मात्र अद्यापही प्रशासनाच्या वतीने या रस्त्यावरील खड्डे बूजवले गेले नाहीत सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा धोतरा खडकी सोनसावंगी या सह परिसरातील अनेक गावांना सेनगावला जाण्यासाठी यांच मार्गावरून जावे लागते मात्र आत्ता या मार्गावरून जाणे खुप कठीण झाले आहे रोडवरील गिट्टी उखलूण पडल्याने या रस्त्यावर छोटे मोठे अपघात देखिल होत आहेत तसेंच वाहन धारकांना या रस्त्यावरून येतांना तारे वरीची कसरत करावी लागत आहेत एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने देशभर महामार्गाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे मात्र अजुन हि ग्रामीण भागतील रस्ते जशास तसे आहेत अंदाजे गेल्या चार पाच वर्षा पुर्वीच हिवरखेडा ते बोरखेडी या रस्ताचे डांबरीकरणचे काम करण्यात आले होते मात्र आत्ता यारस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावरील खड्डे न बुजवता प्रशासनाच्या वतीने त्वरित लक्ष घालून ह्या तीन किलोमीटर रस्ताचे डांबरीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात येत आहे.....
0 टिप्पण्या