💥परभणी तालुक्यातील मौ.परळगव्हाण येथे आज शनिवार दि.२५ जून रोजी कृषी संजीवनी सप्ताहास सुरुवात💥
परभणी (दि.२५ जुन २०२२) - तालुक्यातील मौ.परळगव्हाण येथे आज शनिवार दि.२५ जून २०२२ रोजी कृषी संजीवनी सप्ताहास सुरुवात करण्यात आली हा कृषी संजीवनी सप्ताह सात दिवस वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करून राबविण्यात येणार आहे.
या सात दिवसीय कार्यक्रमांमध्ये कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच कृषी विज्ञान केंद्र परभणी येथील शास्त्रज्ञ, मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत सात दिवसांमध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान प्रसार, मूल्य साखळी, बळकटीकरण, पोस्टीक तृणधान्य दिवस, महिला कृषी तंत्रज्ञान सक्षमीकरण, महिला चर्चासत्र, खत बचत, कृषी विकास योजना गटासाठी सेंद्रिय शेती विषयी मार्गदर्शन, प्रगतशील शेतकरी संवाद शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान आणि शेवटी ०१ जुलै २०२२ रोजी कृषी दिन साजरा करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. स्वाती घोडके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा परभणी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सी. एस. कुरवारे कृषी सहाय्यक यांनी केले, आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्री. व्ही. एस. संघई मंडळ कृषी अधिकारी पिंगळी,हे होते कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक श्री डी. एल. माने, श्री एस व्ही ढाके कृषी सहाय्यक, व्ही. एस. खंडागळे समूह सहाय्यक पोकरा हे होते आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात विकेल ते पिकेल कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मार्फत राजमाता जिजाऊ महिला शेतकरी गटाला स्टॉल देऊन त्या स्टॉलचे उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली श्री. विजय संघई यांनी महिलांना कंपनी स्थापन करून स्वतः प्रिया उद्योग कशाप्रकारे उभारायचा आणि कंपनी स्थापनेचे फायदे तसेच पोखरा अंतर्गत वेगवेगळ्या बाबींचा लाभ कसा घेता येईल याबद्दल सर्व महिलांना मार्गदर्शन केले आणि विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार मूल्य साखळी बळकटीकरण बाबत मार्गदर्शन केले, तसेच डी. एल. माने यांनी महिलांनी विक्री व्यवस्थापन कसे करावे आपण प्रक्रिया केलेला कुठलाही अन्नपदार्थ असेल तरीही आपण जोपर्यंत त्याला आकर्षक करत नाहीत पॅकिंग लेबलिंग चांगल्या प्रकारे करत नाहीत तोपर्यंत आपल्या मालाला हमी भाव मिळणार नाही जास्तीत जास्त महिलांनी गृह उद्योग सुरू करावेत असे आव्हान माने यांनी केले, तसेच श्रीमती. स्वाती घोडके यांनी महिला गटांनी सक्षम व्हावे जास्तीत जास्त महिलांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे आणि राजमाता जिजाऊ महिला गटाने हळद पावडर मिरची पावडर विक्री सुरू केलेली आहे विक्रीचे नियोजन अजून चांगल्या प्रकारे करून आपल्या गट सक्षम करावा आणि यासाठी महिलांनी पुढे येण्याची गरज आहे असे आव्हान केले, तसेच आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. ज्ञानेश्वर शिंदे, श्री. काशिनाथ शिंदे, रामराव शिंदे, पोकरा कृषिमित्र बळी ज्ञानेश्वर शिंदे, तसेच राजमाता जिजाऊ शेतकरी महिला गटातील अध्यक्ष श्रीमती. सरस्वती शिंदे श्रीमती. मीरा शिंदे सचिव आणि गटातील सर्व महिला सदस्य तसेच ताराराणी महिला शेतकरी गटातील अध्यक्ष श्रीमती. वेणूताई शिंदे श्रीमती. छाया शिंदे आणि गटातील सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या व गावातील इतर पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते....
0 टिप्पण्या