💥कै.अंबादासराव वरपुडकर कृषि महाविद्यालयाच्या वतीने टाकळगव्हाण येथे जनावरांचे लसीकरण...!


💥यावेळी पिंगळीतील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ रहीम सय्यद यांची प्रमुख उपस्थिती💥

परभणीतील टाकळगव्हाण येथे ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत कै.अबादासराव वरपुडकर कृषी महाविद्यालय वरपुडच्या ७ व्या सत्रातील विद्यार्थ्यांनी पशुपालन व लसीकरण हा कार्यक्रम शैक्षणिक संचालक डॉ.ए.ए.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ०९ जून २०२२ रोजी आयोजित केला.यात पिंगळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ रहीम सय्यद,कर्मचारी सत्तार शेख , प्रकाश शिंदे व अंकुश वाघमारे आदी उपस्थित होते.


 
डॉ.रहीम यांनी गावकऱ्यांना विविध पशु आजाराबद्दल माहिती दिली . तसेच पशुपालकांनी पावसाळ्यात घ्यावयाची काळजी या बदल मार्गदर्शन देखील केले.यावेळी जनावरांना घटसर्प व फन्या या रोगाची लस देण्यात आली.यात गावातील सरपंच सौ अल्का पितांबरे , उपसरपंच किषावृता वाघ व शेतकरी तुकाराम बाघ,मंचक वाघ , संभाजी वाघ , पंढरी वाघ , श्रीपती वाघ आदी उपस्थित होते . यात कृषिदुत अजहर शेख , सुर्यकांत राठोड , महेश सावरे , श्रेयश चळकरी , आदिनाथ रखदळे , स्वप्नील रौदळे , अक्षय वाढवे , दत्ताहरी यादव , महेश उबाळे , अनिकेत सरकटे , अमोल पवार व कृष्णा शिंदे यांनी प्राचार्य सी . एस . डोगरे , कार्यक्रम , समन्वयक प्रा . एम . आर . मगर , कार्यक्रम अधिकारी तसेच पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख आर . बी . रणेर, प्रा . शिंदे व्ही.डी , डॉ गावंडे ए.बी., डॉ . खंदारे पी . एम ., प्रा . शिंदे ए.ए. ,प्रा . पंडीत एस . जी . यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पाडला..........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या