💥परभणी जिल्ह्यातील बि-बियान खत विक्रेत्यांनो शेतकऱ्यांचा विश्वासघात करू नका त्यांना योग्य कंपनीची बि-बियान द्या...!


💥स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास तोडू नका ; असे आवाहन संभाजी सेनेचे नेते अरूण पवार यांनी केले आहे💥

परभणी : परभणी शहरासह जिल्ह्यातील कृषी खत/बि-बियान विक्रेत्यांना प्रथमतः विनंती की तुम्ही स्वतः पेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणी संदर्भात योग्य मार्गदर्शन करून उच्च प्रतीची बि-बियान व योग्य दरात खतांची विक्री करा त्यांना निकृष्ट दर्जाची बि-बियान देऊन व खतांची ज्यादा दराने विक्री करून त्यांची फसवणूक करू नका कारण अन्नदाता शेतकरी बांधव तुमच्यावर खूप विश्वास ठेवून बियाणे खरेदी करत असतो,

तुम्ही तुमच्या फायद्याकरता शेतकऱ्यांचा भरोसा तोडु नका कारण भरोसा कोणत्याही कंपनीत विकत भेटतं नाही आणि बियाण्यांच्या भरोशावर संपुर्ण वर्षं पिकांची वाट बघत असतो. बियाणे खराब निघाले तर संपूर्ण वर्ष वाया जाते व नंतरचे दोन ते तीन वर्षे शेतकरी कर्जबाजारी होऊन डबघाईस येतो आणि नको तो निर्णय घेतो. म्हणूनच परत एकदा माझे तुम्हाला विनंती पुर्वक सांगने आहे शेतकऱ्यांना चांगलेच दर्जेदार बियाणे खरेदी करायला सांगा कारण शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत असे आवाहन संभाजी सेनेचे नेते अरूण पवार यांनी कृषी खत/बि-बियान विक्रेत्यांना केले असून यावेळी बोलतांना अरूण पवार म्हणाले की निकृष्ट दर्जाची बोगस बि-बियान तसेच खतांची अतिरिक्त दराने विक्री करतांना कोणी आढळल्यास संभाजी सेना त्याच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे याची कृषी खत/बि-बियान विक्रेत्यांनी दखल घ्यावी.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या