💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या बोबडे टाकळी युवा आघाडी सर्कल प्रमुखपदी सोपान हरकळ यांची नियुक्ती....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले💥

परभणी - दि.२१ जून २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा प्रमुख जनसंपर्क कार्यालयात पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली. या बैठकीत परभणी तालुक्यातील बोबडे टाकळी सर्कल प्रमुखपदी प्रहार जनशक्ती पक्षाचे मटकऱ्हाळा येथील सोपान विठ्ठलराव हरकळ यांची नियुक्ती करण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जोरदार संगटन बांधणी ला सुरुवात केली आहे. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढविणार असल्याने जिल्हा परिषद सर्कल निहाय संगटन बांधणी पक्षाच्या वतीने सुरू केली आहे.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, वाहतूक आघाडी तालुका प्रमुख रामेश्वर जाधव, बोबडे टाकळी सर्कल प्रमुख ज्ञानोबा काळे, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, शहर चिटणीस वैभव संघई, मटकऱ्हाळा शाखा प्रमुख उद्धव गरुड, ज्ञानेश्वर गरुड, नामदेव गरुड, शेख अमजद, अशोक गरुड, पांडुरंग गरुड, श्रीनाथ चोपडे, कुंडलिक गरुड, प्रल्हाद गरुड, आदिनाथ गरुड इत्यादी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या