💥पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील नरापूर गावालगत नांदेडहून पुर्णेकडे जलदगतीने धावणारी स्कार्पियो पलटी...!

 


💥या अपघातात ड्रायव्हर गंभीर तर अन्य दोन जखमी💥


पुर्णा (दि.०२ जुन २०२२) - पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नसून आज गुरूवार दि.०२ जुन २०२२ रोजी नांदेडहून पुर्णेकडे जलदगतीने येणारी पांढऱ्या रंगाची स्कार्पियो क्र.एम.एच -२३ एक्स १००८ ही गाडी या मार्गावरील नरापूर गावालगत पलटी झाल्यामुळे या गाडीचा चालक अत्यंत गंभीर जखमी झाल्याचे समजते तर या गाडीत प्रवास करणारे अन्य दोन जन देखील गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आल्याचे समजते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या