💥त्यामुळे विज ग्राहक नागरिक त्रस्त तर महाविरणचा कारभार मदमस्त💥
* शिवशंकर निरगुडे : हिंगोली
सेनगाव तालुक्यातील साखरा येथील अनेक शेतकरी कुटुंबातील नागरिकांना घरगुती लाईट बिल एका महिन्याचे जवळपास दहा हजार, 240 रुपये आले आहे त्यामुळे नागरिक त्रस्त, आहेत उजाडात राहावकी अंधारात हा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न एका महिन्याचे घरगुती लाईट बिल आल्या मुळे साखरा येथील शेतकरी नीळकंठ भादलकर यांना 10 हजार 240 रुपये विज बिल एका महीन्याचे आले आहे त्याना एका महीन्यात 795 युनिट पडले आहेत एकाच महीन्यात इतके यूनिट पडले कसे असे विज बिल साखरा येथील ग्रामस्थांना आल्यानंतर अनेक नागरिकांना धक्काच बसला आहे, ऐण पेरणीच्या तोंडावर एवढे विद्युत बिल आल्या मुळे शेतकरी कुटुंबातील नागरिकांना पेरणी पाणी करावे, का विद्युत बिल भरावे हा मोठा प्रश्न पडला आहे.
विज बिल भरलं नाही तर मीटर कट केले जाणार त्यामुळे अंधारात राहावे कि पेरणी करावी हा प्रश्न शेतकरी कुटुंबातील नागरिकांना पडला आहे, एरवी सरासरी दर महिन्याला तीनशे ते चारशे रुपये विद्युत बिल येणाऱ्यांना दहा ते पंधरा हजार बिल कसे आले हा प्रश्न त्यांना पडला आहे, महावितरणचा मनमानी कारभाराला कोणी मालक आहे का नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे, सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे लोकप्रतिनिधी या प्रकाराकडे लक्ष घालणार का? का संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून नागरिकांची समस्या सोडवनार का हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
* महावितरण ग्राहकाची प्रतिक्रिया :-
दर महिन्याला आम्हाला सरासरी तीनशे ते चारशे रुपये विद्युत बिल येते, ते दर महिन्याच्या महिन्याला भरतो, मात्र या महिन्यात चक्क दहा हजार 240 रुपये बिल आल्यामुळे ते भरणे आम्हाला शक्य नाही, दर महिन्याला 30 ते 40 युनिट असतात, मात्र या महिन्यात तब्बल 795 युनिट पडले, रीडिंग घेणारा शी बोलणं केलं, मात्र त्यांनी सांगितलं तुमच्या मीटरचे जे रीडिंग आहे त्याचा फोटो आम्ही टाकला, मात्र माझा एकच प्रश्न आहे की, एका महिन्यात 795 युनिट वापर माझा झालाच कसा? सरासरी दोन वर्षात एवढे युनिट वापरतो, मग या एका महिन्यात मी का घरात कंपनी चालवतो का कारखाना चालू केला, लाईन मानसी संपर्क केला असता लाईन म्हणणे सांगितले की, या वेळेस तुमचा ओरिजनल मीटरचा फोटो टाकल्यामुळे एवढे बिल आले, मग माझा त्यांना प्रश्न आहे मग एवढे दिवस डुबलीकेट फोटो रीडिंग का देत होते ? बिल येण्यामागे गलती कोणाची आहे ? एवढे बिल आम्ही भरू शकत नाहीत असे साखरा येथील महावितरण ग्राहक निळकंठ भादलकर यांनी म्हटले आहे...
0 टिप्पण्या