💥घटनेतील आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश💥
पुर्णा (दि.१६ जुन २०२२) - पूर्णा येथील रेल्वे परिसरातील रेल्वेच्या बांधकाम कार्यालय (पिडब्ल्यूडी) परिसरात काल बुधवार दि.१५ जुन २०२२ रोजी दुपारी ०३-३० वाजेच्या सुमारास रेल्वे कर्मचारी नारायण देवराम या ५६ वर्षीय इसमाचा थट्टा मस्करीतून झालेल्या वादातून चाकूने भोसकल्याची भयंकर घटना घडली होती घटने नंतर सदरील गंभीर जखमी इसमास उपचार कामी नांदेड येथील विष्णूपुरीतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणातील आरोपीस पूर्णा पोलिसांनी काही तासातच अटक केली असली तरीही या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अगदी शुल्लक कारणावरून देखील शहरात वेळोवेळी गंभीर घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे सर्वसामान्य जनता व्यापारी वर्गात दहशत निर्माण होत आहे.
या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की रेल्वे कर्मचारी असलेल्या नारायण देवराम व सिध्दार्थ अशोक खरे हे दोघे बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात गप्पा मारत होते. त्याचवेळी या दोघांत थट्टा, मस्करीतून वाद झाला. एकमेकांच्या अंगावर हे दोघे धावून गेले. यावेळी सिध्दार्थ खरे याने चाकू काढून नारायण देवराम यांच्या पोटावर वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. नांदेड येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते मृत्यू पावले. दरम्यान, या प्रकरणात पूर्णा पोलिसांनी सिध्दार्थ खरे या आरोपीस ताब्यात घेतले आहे....
0 टिप्पण्या