💥महसूल पंचनाम्या अभावी वीज पडून मेलेल्या बैलाच्या मृतदेहाची अवहेलना...!


💥मृतदेह सांभाळताना शेतकऱ्याचे हाल, डोंगरगाव शे. येथील प्रकार💥

गंगाखेड /प्रतिनिधी

वीज पडून जीवितहानी झाल्यानंतर 24 तासात मदत घ्यायचा नियम असताना चोवीस तास उलटले तरी साधा पंचनामा सुद्धा झाला नसल्याने बैलाच्या मृतदेहाची मात्र अवहेलना झाली. मृतदेह कुत्र्यापासून सांभाळताना माञ शेतकऱ्याचे हाल झाले. हा प्रकार तालुक्यातील डोंगरगाव शे.येथे रविवारी घडली.

डोंगरगाव येथील शेतकरी निवृत्ती डिगंबर सोन्नर यांचा बैल आखाड्या जवळ बांधलेला असताना काल शनिवारी सायंकाळी पाच वाजता वीज पडल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. तलाठ्याचा फोन लागत नसल्याने त्यांनी ही बाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर घातली. बोबडे यांनी शनिवारीच रात्री तात्काळ गंगाखेड तहसीलदार यांना फोन करून माहिती कळवली. रविवारी सायंकाळचे पाच वाजेपर्यंतही या  बैलाच्या मृतदेहाचा पंचनामा झालेला नव्हता. तलाठ्याचा फोन बंद होता. तर तहसीलदार फोन उचलत नव्हते.  डोंगरगाव सज्जा चे कुलकर्णी नावाचे तलाठी असून ते प्रशिक्षणासाठी औरंगाबादला गेल्याचे सांगण्यात येते .प्रतिनियुक्तीवर असलेल्या मुंढे तलाठ्याचा फोन दिवसभर बंद होता .मंडळ अधिकारी गोरे मॅडम यांनी तलाठ्याला आम्ही कळवतो एवढे सांगून मोकळा झाल्या. सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी रविवारी सायंकाळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना एसएमएस करून व मोबाईलवर संपर्क साधून सदर माहिती कळवली. एकूणच नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी झाल्यानंतर 24 तासाच्या आत मदत मिळाली पाहिजे असा नियम असताना गंगाखेड महसूल विभागात मात्र 24 तासात साधा पंचनामा ही होत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

💥गंभीर बाब जिल्हाधिकाऱ्यांना कळवणार - बोबडे पदडेगावकर

नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवित हानी झाल्यानंतर तात्काळ पंचनामा करणे आवश्यक असते. गंगाखेड महसूल विभागातील सावळ्या गोंधळामुळे शनिवारी घटना घडूनही रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत महसूल चा पंचनामा झाला नव्हता.  ही बाब मा जिल्हाधिकारी कडे लेखी कळवणार असून या शेतकऱ्यास मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही  सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या