💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चौवीस तासातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


💥विधान परिषद निवडणूक : कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, इडीचा हा युक्तिवाद हायकोर्टाने स्वीकारला💥

 ✍️ मोहन चौकेकर

*अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली ; कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, इडीचा हा युक्तिवाद हायकोर्टाने स्वीकारला

* दहावीचा ९६.९४ टक्के निकाल ; सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा-९९.२७ टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा-९५.९० टक्के

* नंदुरबार जिल्ह्यातील खांडबार येथील श्रावणी रेल्वे गेटजवळ डंपर आणि रिक्षाचा भीषण अपघात ; सहा जण गंभीर 

* मुंबई उच्च न्यायालयातील कोर्ट रुममध्ये एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न ; बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना लगीच ताब्यात घेतले 

* अग्निपथवरून देशभर आंदोलनाचा भडका ; २०० रेल्वे सेवा ठप्प, सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर जाळपोळ, १ ठार 

* राज ठाकरेंना बजावण्यात आलेले अटक वॉरंट इस्लामपूर अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून रद्द : खटल्याच्या सुनावणीसाठी दूरदृष्य प्रणालीद्बारे हजर राहण्याचे निर्देश दिले.

* औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार, काम गतीने पण दर्जेदार करा – मुख्यमंत्री*

संकल्प कक्षामार्फत करावयाच्या कामात समाविष्ट झालेल्या या योजनेचा विस्तृत आढावा घेतला

* जेसीबीत झोपला अन् पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला!; अकोला तालुक्यातील कुरणखेड जवळ घटना राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे काम करणारे मजूर जेसीबीमध्ये झोपले असतांना मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे जेसीबी नाल्यात कोसळले.

* सरकारी कर्मचाऱ्यांसाठी VPN आणि क्लाऊड सर्व्हिस वापरावर बंदी केंद्र सरकारने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स (VPN) व विविध कंपन्यांच्या क्लाऊड सर्व्हिसेस वापरण्यावर बंदी घातली आहे.

* ‘अग्निपथ’ योजना: हवाई दलात भरती प्रक्रियेला होणार सुरुवात, हवाईदल प्रमुखांनी जाहीर केली तारीख ‘अग्निपथ’ योजनेत भरतीचे वय १७.५ वर्षे ते २१ वर्षापर्यंत ठेवण्यात आले आहे.

* राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या भावाच्या घरावर सीबीआयचा छापा सीमाशुल्क विभागाने अग्रसेन यांच्या कंपनीवर सुमारे ५.४६कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता.

* क्रिकेट खेळणाऱ्या मुलींची संख्या वाढेल ; सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाचे मत गेल्या काही वर्षांत अनेक मुली कुटुंबाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे क्रिकेट खेळण्यात रस घेत आहेत.

* रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईची पकड मजबूत; उत्तर प्रदेशला १८० धावांवर रोखले; एकूण ३४६ धावांची आघाडी गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीनंतर कर्णधार पृथ्वी शॉने (७१ चेंडूंत ६४ धावा) साकारलेल्या अर्धशतकामुळे उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यावर मुंबईने पकड मजबूत केली आहे. 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या