💥अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सेनगाव तहसील कार्यालय समोर आंदोलन....!


💥देशभक्तीची खोटी झालर पांघरूण देशाची अस्मिता असणारी लष्करी यंत्रणा धोक्यात आणण्याचे काम भाजपने केले💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली

सेनगाव येथील तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे वतीने मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले  ठेकेदारी पध्दतीने सैन्य भरती करणाऱ्या आणि भारतीय लष्कराची सुबद्ध व्यवस्था नष्ट करणाऱ्या अग्निपथ योजनेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विरोध असून कृषी कायद्याप्रमाणे ही योजना रद्द करावी यासाठी २० जून रोजी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस मार्फत आंदोलन करण्यात आले.


देशभक्तीची खोटी झालर पांघरूण देशाची अस्मिता असणारी लष्करी यंत्रणा धोक्यात आणण्याचे काम या भाजपने केले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, गरीब कुटुंबातील तरुण देशाच्या सेवेसाठी दाखल होतात आणि देशसेवा करतात.ती देशसेवा करण्याची संधी सैनिक म्हणूनच तरुणांना द्यावी. त्याला ठेकेदारीचे स्वरूप देऊन युवकांचा अपमान करू नये. युवकांना ठेकेदारी पध्दतीने सैन्यात भरती करून घेण्याचा निर्णय भाजपला मागे घ्यावाच लागेल. कारण या देशातील सच्चा देशभक्त आता जागा झाला आहे.. तहसीलदार साहेब  सेनगाव यांना निवेदन देत निदर्शने करणयात आली ..यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव , परमेश्वर इंगोले  पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेनगाव  तालुकाध्यक्ष श्री रवीभाऊ गडदे  राष्ट्रवादी युवती महिला जिल्हाध्यक्ष प्रियंकाताई भगत राष्ट्रवादी युवक काँग्रेस  सेनगाव तालुका अध्यक्ष श्री देविदास गडदे , राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष श्री सत्यम देशमुख, उपाध्यक्ष श्री  राजू गिते ,श्री कुंदरगे सर , राजू वाणी ,लक्ष्मण गिते , आदी तरुण युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या