💥पुर्णेत नगर परिषदेकडून निर्मनुष्य भुखंडावर लाखो रुपयांची विकासकाम : नागरी वसाहती मात्र नागरी सुविधांपासून वंचित...!


💥मुख्याधिकारी अजय नरळे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह : भ्रष्ट लोकप्रतिनिधी व भ्रष्ट गुत्तेदारांनी हितसंबंध💥


पुर्णा (दि.१८ जुन २०२२) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा कारभार 'आंधळ दळदय अन् कुत्र पिठ खातय' अश्या प्रकारचा झाला असून नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे व प्रशासक सुधीर पाटील धृतराष्ट्राची भुमिका निभावताय की काय ? असा गंभी प्रश्न निर्माण करणारे एक नव्हे अनेक घोटाळे उघडकीस येत असून या घोटाळ्यांमुळे पुर्णा नगर परिषद सातत्याने चर्चेत असतांना जिल्हा नगर पालिका प्रशासन विभाग व जिल्हाधिकारी परभणी यांचे या गंभीर बाबींकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास येत असून अनेक प्रकरणांच्या चौकश्या सोईस्कररित्या गुलदस्त्यात टाकण्यात येत असल्यामुळे घोटाळेबाज कर्मचाऱ्यांच्या हिंमतीत कमालीची वाढ झाल्याचे दिसत आहे.


असाच एक गंभीर प्रकार नुकताच समोर आला असून येथील पुर्वी २०१६ मधील प्रभाग रचनेतील प्रभाग क्रमांक १० व आत्ताच्या प्रभाग रचनेतील प्रभाग क्रमांक ३ मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर,महात्मा फुले नगर या भागात रस्ते/नाल्या तसेच पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या नागरिकांना भेडसावत असतांना या नागरी समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे,नगर अभियंता मंगेश देशमुख यांनी या परिसरा लगतच असलेल्या अगदी ओसाड जंगल असलेल्या नुतन जागेवरील प्लॉटींगवर लाखों रुपयांच्या सिमेंट रोड,नाल्यांच्या कामांना मंजुरी देऊन लाखो रुपयांचा विकासनिधी चोरांच्या घशात घातल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला असून सदरील प्लॉटींगवर अगदी निकृष्ट रस्ते नाल्यांची बांधकाम करून विकासनिधीची विल्हेवाट लावली जात असल्यामुळे याकडे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी तात्काळ लक्ष देवून नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभारावर अंकुश लावावा अशी मागणी होत आहे......  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या