💥जिंतूर ते धानोरा बस सेवा सुरू उटी पूर्णा येथे राहणार मुक्कामी बस...!


💥ग्रामस्थांच्या वतीने चालक व  वाहक यांचा सत्कार💥 

शिवशंकर निरगुडे ; हिंगोली

गेल्या दोन वर्षा पासून कोविड मुळे बस सेवा बंद झाल्या होत्या मात्र आत्ता कोविड चे प्रमान कमी  झाल्या मुळे सर्व बस सेवा चालू झाल्या आहेत मात्र अद्यापही ग्रामीण भागातील मुक्कामी बस सेवा मात्र अद्यापही बंदच होत्या जिंतूर ते धानोरा बस सेवा  पासून सुरू झाली आहे हि बस दि.06/06/2022 पासुन सुरु झाली असुन जिंतुर ,धानोरा ,उटी(पुर्णा) सायं 6:00 वा.जिंतरहुन निघेल व मुक्कामी उटी(पुर्णा) येथे थांबेल व सकाळी 5:30 उटी (पुर्णा) हुन जिंतुर कडे रवाना होईल 

या वेळी गावातील ग्रामस्थांच्या वतीने चालक श्री प्रभाकर शिंदे साहेब व वाहक श्री देशमुख साहेब यांचा उटी(पुर्णा) गावकरी यांच्या वतिने टोपी रुमाल देऊन सत्कार करण्यात आला या वेळी गावातील आदी मंडळी उपस्थिती होते हि बस जिंतूर येलदरी हत्ता साखरा कापडसिंगि मार्गे चालू झाली आहे बस सेवा चालू झाल्या  मुळे अनेक ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे आत्ता रोज हि बस संध्याकाळी उटी पूर्णा येथे येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या