💥जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब रामपूरकर तर सहसंघटक पदी शेख माबुद यांची निवड....!


💥परभणी जिल्हा अध्यक्ष प्रदीप कोकडवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान💥

जिंतूर प्रतिनिधी. /  बी.डी. रामपूरकर

जिंतूर महाराष्ट्र पत्रकार संघ जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या वतीने दिनांक 11 जून  शनिवार रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकघेण्यात आली त्या मधे  जिंतूर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब रामपूरकर तर संघटन पदी शेख माबुद यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र पत्रकार संघाची परभणी जिल्हा अध्यक्ष प्रदीप कोकडवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 11 जून शनिवार रोजी दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह जिंतूर येथे इलेक्ट्रॉनिक मीडिया  कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये येणाऱ्या नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीविषयी चर्चा करण्यात आली.  व त्याच बरोबर जिंतूर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्याध्यक्ष पद रिक्त असल्याकारणाने या रीक्त पदावर चर्चा करून अजित न्यूज पोर्टल जिंतूर तालुका प्रतिनिधी बाळासाहेब रामपूरकर यांची नियुक्ती करण्यात आली व तसेच हिंगोली लोक प्रश्नाचे तालुका प्रतिनिधी शेख माबुद यांची निवड करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाची परभणी जिल्हाध्यक्ष प्रदीप कोकडवार, जिंतूर इलेक्ट्रॉनिक मीडिया तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण सचिव अमजद पठाण संघटक सय्यद फिरोज सल्लागार सचिन रायपत्रिवार, सहसचिव महेश देशमुख, दिलीप माघाडे ,जिंतूर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे उपाध्यक्ष शेख रहिम व हनीफ भाई राम रेगडे ,संदीप माहुरकर ,रामकिशन ठोंबरे ,मनोज टाक बोरी आदी उपस्थित होते.

सर्व पत्रकार व पदाधिकारी यांनी नुतन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यामुळे सत्कार करण्यात आला...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या