💥दिव्यांग अनुराधा सोळंकीची पोलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर तलवार बाजी स्पर्धेसाठी निवड....!


💥परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने आई-वडिलांसोबत तिने मोलमजुरी केली💥

✍️ मोहन चौकेकर

बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली  तालुक्यातील पाटोदा या छोट्याश्या गावातील दिव्यांग असलेल्या अनुराधा पंढरी सोळंकी हि व्हिलचेयर तलवारबाजी स्पर्धेसाठी आपल्या देशाचे, राज्याचे नाव करण्यात यशस्वी झाली आहे. यापुर्वी तिने  2019 मध्ये नेदरलँड्समध्ये पार पडलेल्या व्हिलचेअर तलवारबाजी स्पर्धेमध्ये जागतिक वर्ल्ड रेकिंगमध्ये सेंबर या प्रकारात 54 वे स्थान मिळवले होते. तसेच 2019 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील व्हिलचेअर स्पर्धेमध्ये 3 कांस्यपदक महाराष्ट्र संघाला मिळवल दिले होते. त्याचप्रमाणे 2021मध्ये हरयाणा येथे झालेल्या व्हिलचेअर तलवारबाजी स्पर्धेमध्ये 2 रजत व 1 कांस्यपदक महाराष्ट्र संघाला मिळवून दिले होते.अनुराधा आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने आई-वडिलांसोबत तिने मोलमजुरी केली. आपले एम. ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. मंत्रालयात वेटर पदावर तिला नोकरी लागली.   तिची ओळख तलवारबाजीतील  काही प्रशिक्षकांसोबत झाली. आणि तिने मंत्रालयातील वेटरची नोकरी सांभाळून तलवारबाजीचा सराव देखील सुरू ठेवला. त्यामध्ये तिने आपल्या खेळातील कौशल्य दाखवले. नॅशनल, इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. त्या माध्यमातून तिची पोलांडमधील वर्सोवा येथे होणाऱ्या व्हीलचेअर तलवारबाजी वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे.

पोलंड येथे 7 ते 10 जुलै दरम्यान होत असलेल्या वर्ल्ड कपसाठी ती बुलडाणामध्ये सराव करत आहे. आपण देशासाठी सुवर्णपदक मिळवू, याचा तिला विश्वास आहे. आणि त्या पद्धतीने ती मेहनत सुद्धा घेत आहे. मात्र तिची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. या स्पर्धेमध्ये जाण्यासाठी  लाखो रुपयांचा खर्च येत आहे. 

* अनुराधा सोळंकीला दानशुरांच्या मदतीची गरज आहे :-

दिव्यांग कन्येला वर्डकप खेळण्यासाठी मदतीचा हात हवाय. पोलंडमधील वर्ल्डकपमध्ये व्हीलचेअर तलवारबाजी खेळणार आहे. दिव्यांगांच्या व्हीलचेअर तलवार बाजीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली बुलडाण्याची अनुराधा सोळंकी ही महाराष्ट्रातील पहिली कन्या आहे. तिची निवड आता पोलंड येथे होणाऱ्या वर्ल्डकपसाठी झालीय. मात्र तिची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने  अनुराधाला मदतीची अपेक्षा आहे.  मदतीसाठी मोबाईल नंबर 8975043931 Account no.253501000007021  / IFSc Co.ioBA 0002535 दानशुर व्यक्तींनी तिला मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या