💥अतिक्रमण पिडीत कुटुंबांची तहसिलदारांकडे तक्रार : गटविकास अधिकाऱ्याने दाखवली तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली💥
पूर्णा (दि.०६ जुन २०२२) - तालुक्यातील पांगरा ढोणे येथील महादेव मंदिर देवस्थाच्या पाठीमागील परिसरात राहणाऱ्या एका अतिक्रमण धारकाने चक्क शेजारी राहणाऱ्या तब्बल पाच ते सहा शेताऱ्यांच्या रहादारीच्या रस्त्यावर पक्के बांधकाम करून अतिक्रमण करीत त्यांच्या जाण्या येण्याचा रस्ताच बंद केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या संदर्भात मागील सात महिण्यांपासून या अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण हटवून रहदारीचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा याकरीता अतिक्रमण पिडीत अतिक्रमण धारकाच्या शेजारील सहा कुटुंब संघर्ष करीत असून या संदर्भात अतिक्रमण पिडीत कुटुंबातील आनंता गिरी,गोरखनाथ गिरी,बालाजी ढोणे,गजानन ढोणे,बापुराव ढोणे,भागवत ढोणे यांनी दि.२१ डिसेंबर २०२२ रोजी संबंधित अतिक्रमण धारक सोपान रामजी ढोणे व गणपती रामजी ढोणे यांच्या विरोधात पांगरा ढोणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अशोक तुकाराम खुपसे,पुर्णेचे तहसिलदार पल्लवी टेमकर व पुर्णा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी वानखेडे यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर देखील तब्बल सहा/सात महिण्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याचे निदर्शनास येत असून अतिक्रमण पिडीत तक्रारदारांनी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर गट विकास अधिकारी वानखेडे यांनी तात्काळ अतिक्रमण स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण काढून अहवाल सादर करण्याची कारवाई करण्या संदर्भात तहसिलदार टेमकर यांनी दि.२५ जानेवारी २०२२ रोजी जा.क्र.२०२२/जमाबंदी/कावि-३२ नुसार लेखी आदेश काढले होते परंतु या आदेशाची तब्बल पाच ते साडेपाच महिण्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील ग्राम विकास अधिकारी अशोक खुपसे व गट विकास अधिकारी वानखेडे यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता तालुका दंडाधिकारी तथा तहसिलदार मेटकर यांच्या आदेशाला चक्क केराची टोपली दाखवल्याचे निदर्शनास येत असून संबंधित अतिक्रमण पिडीत सहा कुटुंब अतिक्रमण धारकाच्या अतिरेकी अतिक्रमणामुळे त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत आहे.....
0 टिप्पण्या