💥पुर्णेत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महिला प्रवक्ता नुपूर शर्मा यांचा निषेध....!


💥मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी💥

पुर्णा (दि.०१ जुन २०२२) - भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्या यांनी नुपूर शर्मा यांनी टाईम्सनाऊला दि.२६ मे २०२२ रोजी दिलेल्या लाईव्ह चर्चा सत्रामध्ये मुस्लिम धर्माचे शेवटचे पैम्बर मोहम्मद यांच्या बद्दल 'हेट स्पीच' केल्या प्रकरणी त्यांचा पुर्णेतील मुस्लीम बांधवांकडून आज बुधवार दि.०१ जुन रोजी निषेध करण्यात आला असून मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी भाजपाच्या महिला राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

सदरील निवेदनात असे म्हटले आहे की अशा प्रकारे देशात मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणे हे सर्रास सुरू आहे. या प्रकरणी पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड यांना दिलेल्या निवेदनात नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी करण्यात आली

सदरील निवेदनावर शेख सरान शेख जहीर,शेख अक्रम शेख हबीब, शेख इरफान शेख बाबु,मो शफिक मो रफिक,शेख मसूद शेख मुर्तूजा,शेख गौस तारा.शेख असद शेख चाद. सोहेल पठाण शेख आरिफ भाई.शेख परवेज आदींच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या