💥परभणी जिल्ह्याचा दहावीचा 95.37 टक्के निकाल....!


💥इयत्ता दहावीत 26 हजार 659 विद्यार्थी उत्तीर्ण💥

परभणी (दि.१७ जुन २०२२) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवार दि.१७ जुन २०२२ रोजी जाहीर झाला असून संपूर्ण जिल्ह्याचा ९५.३७ टक्के एवढा निकाल लागला आहे.

आज शुक्रवारी दुपारी ०१:०० वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तात्काळ तो निकाल ऑनलाईनद्वारे अवगत केला. निकाल पाहिल्या पाठोपाठ विद्यार्थ्यांचे चेहरे उजळले. तर त्यांचे पालक व नातेवाईकही पाल्यास अपेक्षेप्रमाणे पडलेल्या गुणांमुळे भारावून गेले.

परभणी जिल्ह्यातील २८ हजार ४२३ विद्यार्थ्यानी परीक्षेसाठी नोंदणी केली. यापैकी २७ हजार ९५३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यातील २६ हजार ६५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी ९५.३७ इतकी आहे.

          कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण शैक्षणिक वर्षच दोन वर्षांपासून कोलमडले होते. शाळा पूर्णतः ठप्प होत्या. शेवटच्या टप्प्यात काही महिने शाळा सुरु झाल्या. परंतु, विद्यार्थ्यांची संख्या ओसरली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब शैक्षणिक संस्थांनी केला होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या