💥महाराष्ट्रातील 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी यांना सुधारीत किमान वेतन लागू....!


💥हिंगोली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन च्या वतीने जिल्हा परिषदेत भव्य सत्कार सोहळा संपन्न💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन 4511 चे राज्याध्यक्ष श्री विलासभाऊ कुमरवार व राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव  परमेश्वर इंगोले पाटील यांचा हिंगोली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन च्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी  उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोंद्रे,डिगांबर सोनटक्के  (वाशिम जिल्हा उपाध्यक्ष),हिंगोली जिल्हाअध्यक्ष संतोष शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष भागवत इंगोले ,जिल्हा सचिव नागसेन खंदारे,रामरावजी कल्याणकर,लक्ष्मण मांडगे पाटील,मस्के मामा, कुंदरगे पाटील,पठाडे पाटील,जे के पाटील,फुलाजी इंगोले तालुका अध्यक्ष,जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी या पाचही तालुका कार्यकारिणी पदाधिकारी आणि जिल्ह्यातील असंख्य ग्रामपंचायत कर्मचारी सदरील कार्यक्रमास उपस्थित होते.

जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सुखावल्याचे चित्र दिसत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या