💥कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व नामकृवि परभणी येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे 3 दिवशीय प्रशिक्षण संपन्न...!

💥सदरील कार्यक्रमास कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व नामकृवि, परभणीचे व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे अध्यक्ष म्हणून लाभले💥

परभणी : विस्तार शिक्षण संचालनालय अंतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी आणि वनश्री सामाजिक, सांस्कृतीक व ग्रामीण विकास संस्था नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने दि. 08 ते 10 जुन 2022 रोजी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण घेण्यात आले. सदरील प्रक्षिशणाचा उद्देश हा शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून त्यांच्या सोबत जोडलेल्या शेतक-यांचे ज्ञान वृद्धींगत करून त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे होय. त्याअनुषंगाने सदरील प्रशिक्षण तीन दिवशीय प्रशिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने सोयाबीन, कापुस व हळद लागवड, विक्री आणि प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थ निर्मीती, शेळीपालन, शेतीमधील संधी, आव्हाने व समस्या तसेच मुल्यसाखळी विश्लेषण आणि विपणन, कृषि प्रणाली मध्ये स्टोरेज, पॅकेजींग, ब्रँण्डींग व लेबलींग यांचे महत्व इत्यादी विषयावर विद्यापीठातील तज्ञ प्राध्यापकामार्फत मार्गदर्शन करण्यात आले.


कार्यक्रमाची सांगता दि 10 जून 2022 रोजी मा.संचालक विस्तार शिक्षण, वनामकृवि, परभणी डॉ.डी.बी.देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सदरील कार्यक्रमास कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी चे व्यवस्थापक डॉ.गजानन गडदे अध्यक्ष म्हणून लाभले. तर प्रमुख पाहुणे म्हणून वनश्री संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश राठोड, श्री. मितेश मालीवाल, चार्टेड अकाऊंटंट, नांदेड, व डॉ.मधुमती कुलकर्णी हे लाभले. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व श्री.मधुकर मांडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. दिपरत्न सूर्यवंशी यांनी मानले. 

अध्यक्षीय समारोपात डॉ. गडदे म्हणाले की शेतक-यांच्या शेतीशी निगडीत समस्याचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ आपल्या सदैव तत्पर राहील अशी त्यांनी ग्वाही दिली. उपस्थीत प्रशिक्षणार्थींपैकी मनोगत व्यक्त करताना वनश्री संस्थेच्या संचालिका श्रीमती नीता माळी म्हणाल्या की सदरील प्रशिक्षणामधून अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती मिळाल्याबद्दल आम्ही खूप समाधानी झालो आहोत असे मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, येथील श्री. ज्ञानोबा माहोरे, श्री. दिगंबर रेंगे, श्री. नितीन मोहिते, शेख साजेद व शेख सुलताना शेख पाशा यांनी विशेष परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या