💥नांदेड येथील शहीदपुरा भागातील रहिवाशी तथा सामाजिक सेवक स.उत्तमसिंघ निशानची 16 व्या हेमकुंट साहिबच्या यात्रेवर...!


💥त्यांच्या व कुटुम्बियांच्या या यात्रेस शीख समजातुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत💥

नांदेड (दि.20 जुन 2022) : येथील शहीदपुरा भागातील रहिवाशी आणि सामाजिक सेवक स. उत्तमसिंघ  निशानची सलग सोळाव्या वर्षी धार्मिक तीर्थस्थळ श्री हेमकुंट साहिब दर्शनासाठी सहकुटुंब व इतर भाविकांना घेऊन यात्रेसाठी रवाना झाले आहे.दि.19 जून रोजी सकाळी रेलवेगाडीच्या माध्यमाने उत्तमसिंघ निशानची, स.भागसिंघ रिसालदार, स. बचनसिंघ सरदार सह महिला आणि लहान मंडळी यात्रेसाठी निघाली आहे. या यात्रेत उत्तराखंड येथील दुर्गम आणि हिमाछादित पर्वतावर स्थापित श्री हेमकुंट साहेब, ऋषिकेश सह अनेक धार्मिक स्थळांना भेटी देण्यात येतील. त्यांच्या व कुटुम्बियांच्या या यात्रेस शीख समजातुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या