💥पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 10780 रुपयांचा मुद्देमालजप्त करण्यात आला आहे💥
जिंतूर प्रतिनीधी / बी.डी. रामपूरकर
जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोसी या गावी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या दुकानावर छापा टाकून देशी दारूच्या एकूण 154 बाटल्या जप्त केल्या आहेत.
आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी एका खताच्या मध्ये व नातेवाईक रामेश्वर काळोजी घोगरे यांच्या घरामध्ये कुलूप लावून ठेवून देशी भिंगरी संत्रा असे कागदी लेबल असलेल्या प्रत्येकी 180 एम एल च्या काचेच्या एकूण 154 बॉट्टल अशाप्रकारे एकूण 10780 रुपयांचा मुद्देमालजप्त करण्यात आला आहे. फिर्यादी भगवान रावसाहेब सोडगीर वय 38 व्यवसाय नोकरी पोना/ 816 नेमणूक पो स्टे बामणी यांच्या फिर्यादीवरून आरोपी सूर्यभान उद्धव कोकाटे व रामेश्वर काळोजी घोगरे यांच्यावर कलम 65 ( इ) 83 म.दा.का. नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरील आरोपी हा फरार असून पोलीस निरीक्षक भूमे यांच्या आदेशाने पुढील तपास बीट क्रमांक 2 बीट जमादार निळे हे करीत आहेत....
0 टिप्पण्या