💥मागील चार वर्षात 14 जूनपर्यंत यावर्षी सर्वाधिक खरीप पीक कर्ज वाटप 74 टक्के शेतकऱ्यांना मिळाले 63 टक्के पीक कर्ज...!


💥81 हजार 367 शेतकऱ्यांना 729 कोटी 85 लाख रुपये पीक कर्ज उपलब्ध💥

फुलचंद भगत

वाशिम: जिल्हयाचा मुख्य व्यवसाय हा शेती. जिल्हयाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे. 4 लाख 59 हजार 763 हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे. त्यापैकी खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 4 लाख 6 हजार हेक्टर आणि रब्बी पिकाखालील क्षेत्र 82 हजार 166 हेक्टर इतके आहे. तर सिंचनाखालील क्षेत्र हे केवळ 51 हजार 773 हेक्टर इतके आहे. जिल्हयाचे मुख्य पीक हे सोयाबीनचे आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात पत पुरवठा करण्यात बॅकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. मागील चार वर्षाचा विचार केल्यास सन 2019-20 ते सन 2022-23 या चार वर्षाच्या कालावधीतील 14 जूनपर्यंत सर्वाधिक खरीप पीक कर्जाचे वाटप यावर्षी 14 जून 2022 पर्यंत 63.47 टक्के करण्यात आले.

            जिल्हयातील बहुतांश पिकाखालील क्षेत्र हे कोरडवाहू आहे. मोठया प्रमाणात सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करावी लागते. दरवर्षी शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असते. कोणत्याही खातेदार शेतकऱ्याची जमीन पैशाअभावी पडीक राहू नये यासाठी बि-बियाणे, रासायनिक खते, पेरणी आणि मशागतीसाठी बँकांमार्फत दरवर्षी पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध पिकांचे उत्पादन घेवून आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. शेतकऱ्यांना आवश्यक त्या वेळेत पीक कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. त्यांना पीक कर्ज घेतांना कोणत्याही अडचणी जावू नये यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी हे बँकांच्या अधिकाऱ्यांकडून दर आठवडयाला पीक कर्ज वितरणाचा आढावा घेवून बँकांना पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट पुर्ण करण्याचे निर्देश देतात.

            सन 2022-23 या वर्षात 1 लाख 16 हजार 650 शेतकऱ्यांना 1150 कोटी रुपये खरीप पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट बँकांना दिले असता 14 जून 2022 पर्यंत 81 हजार 367 शेतकऱ्यांना 729 कोटी 85 लाख रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. 74.82 टक्के शेतकऱ्यांना 63.47 टक्के हे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. 14 जूनपर्यंत मागील चार वर्षाचा विचार करता यावर्षी 14 जून 2022 पर्यंत सर्वाधिक खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हयात 11 सार्वजनिक बँकांच्या 50 शाखा, 4 खाजगी बँकांच्या 7 शाखा, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या 17 शाखा आणि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 42 शाखा आहेत. यावर्षी 14 जूनपर्यंत 15 हजार 380 शेतकऱ्यांना 154 कोटी 63 लाख रुपये सार्वजनिक बँकांनी, 735 शेतकऱ्यांना 13 कोटी 34 लाख रुपये खाजगी बॅकांनी, 9442 शेतकऱ्यांना 102 कोटी 93 लाख रुपये विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने आणि 55 हजार 810 शेतकऱ्यांना 498 कोटी 90 लाख रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. ही आकडेवारी मागील चार वर्षात सर्वाधिक आहे.

             सन 2019-20 मध्ये या वर्षात 14 जूनपर्यंत 28 हजार 727 शेतकऱ्यांना 237 कोटी 41 लाख रुपये वाटप केले. यामध्ये सार्वजनिक बँकांनी 4 हजार 565 शेतकऱ्यांना 39 कोटी 77 लाख रुपये, खाजगी बँकांनी 739 शेतकऱ्यांना 11 कोटी 26 लाख रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेने 1502 शेतकऱ्यांना 14 कोटी 46 लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 21 हजार 921 शेतकऱ्यांना 171 कोटी 92 लाख रुपये वाटप केले. हे पीक कर्ज 51 टक्के शेतकऱ्यांना 15.48 टक्के इतकी रक्कम वाटप करण्यात आली.

             सन 2020-21 या वर्षात 14 जूनपर्यंत 42 हजार 361 शेतकऱ्यांना 329 कोटी 12 लाख रुपये, यामध्ये सार्वजनिक बँकांनी 8 हजार 937 शेतकऱ्यांना 71 कोटी 56 लाख रुपये, खाजगी बँकांनी 403 शेतकऱ्यांना 8 कोटी 6 लाख रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेने 2723 शेतकऱ्यांना 27 कोटी रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 30 हजार 298 शेतकऱ्यांना 222 कोटी 41 लाख रुपये वाटप केले. हे पीक कर्ज 20.57 टक्के शेतकऱ्यांना 37.48 टक्के इतकी रक्कम वाटप करण्यात आली.

             सन 2021-22 या वर्षात 14 जूनपर्यंत 70 हजार 5 शेतकऱ्यांना 570 कोटी 40 लाख रुपये वाटप करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक बँकांनी 9 हजार 944 शेतकऱ्यांना 88 कोटी 18 लाख रुपये, खाजगी बँकांनी 398 शेतकऱ्यांना 8 कोटी 17 लाख रुपये, विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेने 5547 शेतकऱ्यांना 55 कोटी 50 लाख रुपये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 54 हजार 116 शेतकऱ्यांना 418 कोटी 56 लाख रुपये वाटप केले. हे पीक कर्ज 66.80 टक्के शेतकऱ्यांना 55.65 टक्के इतकी रक्कम वाटप करण्यात आली. मागील वर्षी खरीप पीक हंगामात शासनाने जिल्हयाला पीक कर्ज वाटपाचे जे उदिष्ट दिले होते ते उदिष्ट पुर्ण करण्यात आल्यामुळे शासनाने अतिरिक्त 100 कोटी रुपये सन 2022-23 या वर्षात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी उपलब्ध करुन दिले. बँका खातेदार शेतकऱ्यांशी संपर्क साधून तसेच गावात पोहोचून शेतकऱ्यांना कागदपत्रांची पुर्तता करुन मागील वर्षीचे पीक कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन देत आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीक कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्यवेळी पीक कर्ज उपलब्ध होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या