💥II मातृत्व दिन विशेष - "स्वामी तिन्ही जगाचा,आई विना भिकारी"....!


💥सारा जन्म चालुन पाय जेव्हा थकुन जातात,तेव्हा शेवटच्या श्वासा बरोबर आई हेच शब्द राहतात💥

✍️ मोहन चौकेकर

        घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनांत आई नावाचं पान कधीच मिटत नाही.

सारा जन्म चालुन पाय जेव्हा थकुन जातात, तेव्हा शेवटच्या श्वासा बरोबर आई हेच शब्द राहतात.

     "स्वामी तिन्ही जगाचा,आई विना भिकारी"

अमेरिकेत सर्वप्रथम मातृत्वदिन साजरा करण्यास सुरुवात झाली.  अॅना जार्विस ही आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत होती. ती अविवाहीत होती. तसेच, तिने दत्तक म्हणून अपत्य देखील घेतले नव्हते. ती सदैव आपल्या आईसोबतच राहात असे. आपल्या प्राणप्रिय जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अॅना  जार्विस हिने आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यार्थ 'मदर्स डे' मातृत्व दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

            जगभरात साजरे केले जाणारे विविध दिन हे विशिष्ठ तारखेला असतात. पण, मदर्स डेचे वैशिष्ट्य असे की, हा दिवस साजरा करण्यासाठी कोणतीच तारीख कधीही निश्चितपणे ठरलेली नसते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी ९ मे १९१४ रोजी एक कायदा संमत केला. या कायद्यात लिहिले होते की, प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्यात यावा. तद्नंतर भारतासह जगभरातील अन्य देशांमध्येही हा दिवस साजरा केला जाऊ लागला. आणि तो देखील प्रत्येक वर्षीच्या मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी.

            आ - म्हणजे "आत्मा"

             ई -  म्हणजे "ईश्वर"

आत्मा व ईश्वर यांचे एकरुप म्हणजे "आई"

माझ्यासह सृष्टीतील समस्त सजीवांना जन्म देणाऱ्या असंख्य मातांच्या चरणांवर माझा साष्टांग दंडवत. मातृ दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार मोहन चौकेकर , मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या