💥घोटाळेबाज प्रशासकीय अधिकारी...घोटाळेबाज इंजिनियर घोटाळेबाज लेखापाल...नागरीक बेहाल💥
पुर्णा नगर परिषदेत ना मुख्याधिकारी हजर....ना प्रशासक हजर प्रशासनात निव्वळ घोटाळेबाजांचा गजर असा एकंदर कारभार नगर परिषदेत झाला असून कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली भव्य इमारत व या इमारती लाखों रुपयांच्या खर्चातून प्रत्येक अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी बनवण्यात आलेल्या सुसज्ज अश्या सुंदर स्वतंत्र कॕबीन तरीही अधिकारी/कर्मचाऱ्यांची गैरहजेरी नागरिकांसाठी डोकेदुखी निर्माण करीत असून नागरिकांना बांधकाम परवाना/नाहरकत प्रमाणपत्र/मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र/रहिवासी प्रमाणपत्र आदींसह जन्म/मृत्यू प्रमाणपत्रासाठी देखील नगर परिषदेत चक्करा माराव्यात लागत असून याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे शहरातील नागरिकांना नागरी सुविधांसाठी देखील अक्षरशः तरसावे लागत असून मान्सुन अर्थात पावसाळा सुरू होण्यास अवघ्या आठ दिवसांचा कालावधी बाकी असतांना पुर्णा-थुना नदीच्या काठावर वसलेल्या या पुर्णा शहरातील ओढ्यांसह छोट्या मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेला देखील अद्याप पर्यंत सुरूवात झाल्याचे दिसत नसून मान्सुनपुर्व शहरातील छोट्या मोठ्या नाल्यांसह ओढ्यांची स्वच्छता झाली नाही तर पुर्णा-थुना नदीच्या पाण्यात पावसामुळे वाढ झाल्यास गावातून वाहणारे पाणी व पावसाचे पाणी शहरातील अनेक भागातील घरांमध्ये घुसून नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढेच नव्हे स्वच्छते अभावी शहरात वाढणाऱ्या डासांमुळे मागील वर्षा प्रमाणे याही वर्षी मलेरीया,टाईफाईड,काविळ,गॅस्टो,डेंग्यू सारखे विविध साथींचे आजार देखील फैलावण्याची शक्यता आहे.
एकंदर पुर्णा नगर परिषदेचा कारभार संपूर्णतः बेलगाम झाल्याचे निदर्शनास येत असून प्रशासक सुधीर पाटील व मुख्याधिकारी अजय नरळे यांची नगर परिषद प्रशासनावर यत्किंचितही पकड नसल्यामुळे नगर परिषदेत भ्रष्ट घोटाळेबाज अधिकारी/कर्मचाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालीत घोटाळ्यांवर घोटाळे करण्याची चढाओढच सुरू केल्याचे निदर्शनास येत असून प्रथमतः कुठलेही ई-टेंडर न काढता जुना मोंढा परिसरातील गोंधळसम्राट राजाराम बापू कदम सांस्कृतिक सभागृहा लगतच्या सात दुकानांची मुख्याधिकारी/प्रशासकीय अधिकारी/आस्थापणा विभागाचे मुख्य लेखापाल यांनी परस्पर विल्हेवाट लावली यानंतर शहरातील विविध भागात राज्यसभा/विधान परिषद सदस्यांच्या विकासनिधीतून होणारी सिमेंट रस्ते-नाल्यांची कामे पुर्वी अल्पकालावधी अगोदर झालेल्या कामांवरच नवी काम दाखवून कनिष्ठ अभियंता दिपके,मुख्याधिकारी,प्रशासकीय अधिकारी,आस्थापणाचे मुख्य लेखापाल यांनी कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीची विल्हेवाट लावली यानंतर पुन्हा अधिकाराचा गैरवापर करित प्रशासकीय अधिकारी सय्यद इमरान,आस्थापणाचे मुख्य लेखापाल नंदलाल चावरे यांनी जिल्हा अधिकारी/जिल्हा नगर पालिका प्रशासनाची कुठल्याही प्रकारची लेखी स्वरूपात परवानगी न घेता आर्थिक तडजोड करून दोन अनुकंपाधारक व तिन अन्य कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरती करीत लाखो रुपयांचा घोटाळा केला यानंतर नगर परिषदेत स्वच्छता निरिक्षक पदावर कार्यरत नईम खान पठाण व मुख्य लेखापाल चावरे यांनी मुख्याधिकारी यांची खोटी स्वाक्षरी मारून तसेच नगर परिषदेच्या शिक्क्यांसह एका संस्थेच्या संस्था अध्यक्षाची खोटी स्वाक्षरी व शिक्क्यांचा गैरवापर करून असंख्य बोगस बांधकाम कामगार अनुभव प्रमाणपत्रांचा घोटाळा करून हजारो रुपयांची अफरातफर केली नगर परिषदेवर प्रशासकांची नियुक्ती होण्यापुर्वी देखील या अधिकारी कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांच्या भंगाराची विल्हेवाट लावली परंतु या घोटाळ्यावर देखील कर्मचारी भरती घोटाळ्यासह बोगस विकासकामांच्या घोटाळ्यांप्रमाणे सोईस्कररित्या पडदा टाकण्याचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून 'चोर चोर मौसेरे भाई' या उक्तीचा प्रत्यय पुर्णेकरांना आणून दिला त्यामुळे घोटाळ्यांचे सुत्रधार नगर परिषदेतून अदृश्य जरी झाले असले तरी नगर परिषदे बाहेरून हे घोटाळेबाज आपला कारभार सुरळीतपणे हाताळतांना पाहावयास मिळत आहेत....
0 टिप्पण्या