💥पुर्णा-नांदेड मार्गावरील गौर फाट्या जवळ भिषण अपघात ; बेलगाम कार चालकाने दुचाकी स्वारासह ॲटोला उडवले...!


💥या भिषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी ॲटो पॉईंटला उभा असलेल्या ॲटोचाही चुराडा💥


पुर्णा (दि.०८ मे २०२२) - पुर्णा-चुडावा-नांदेड राज्य मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले असून या मार्गावरील गावांलगत गतिरोधक नसल्याकारणामुळे भरघाव वेगाने धावणाऱ्या बेलगाम वाहन चालक सातत्याने अपघातास कारणीभूत ठरत असून मागील २३ एप्रिल २०२२ रोजी याच मार्गावर भरघाव वेगाने धावणाऱ्या आयशर चालकाने गौर जवळील केनॉल जवळ दुचाकीस्वाराला उडवले होते या घटनेत एका २६ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेला पंधरा दिवस होत नाही तोच आज रविवार दि.०८ मे २०२२ रोजी सकाळी ०८-३० वाजेच्या सुमारास या पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील गौर फाट्यालगत पुर्णेहून नांदेडच्या दिशेने सुसाट वेगाने धावणाऱ्या बेलगाम वेगनार कार क्र.एम.एच.१४ जेए ७२५२ च्या चालकाने दुचाकी क्र.एम.एच.२२ एटी ४६९८ या दुचाकीसह ॲटो पॉईंटला उभा असलेल्या एम.एच.२६ एसी ०४८७ या ॲटोलाही उडवले या भिषण अपघातात दुचाकीस्वार शिवचरण पारवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृर्ती गंभीर असल्यामुळे त्यांना स्थानिक डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी तात्काळ नांदेड येथील रुग्नालयात हलवण्यास सांगितले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या