💥वाशीम शहराला अस्वच्छ व गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने मनसे आक्रमक......!


💥मुख्याधिकारी नगर पालिकेत उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून व गढूळ पाण्याची बॉटल देऊन आंदोलन💥


फुलचंद भगत

वाशिम:-शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने  मनसे सैनिक रितेश देशमुख यांच्या नेतृत्वात नगर परिषद येथे मुख्याधिकारी हे उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून व गढूळ पाण्याची बॉटल देऊन आंदोलन करण्यात आले.


                  वाशिम शहरातील होत असलेल्या दूषित पाणी पुरवठा न .प.ला दिले निवेदन स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास मुख्याधिकारी याना तेच पाणी पाजू असा इशारा मनसे सैनिक रितेश देशमुख यांनी निवेदनातून दिला होता.शहरात ठीक ठीकानी गढूळ पाणी पुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.एकीकडे दहा ते बारा दिवसाड पाणी पुरवठा होत आहे.या परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठाहोत नसल्याने अपव्यय होणाऱ्या पाण्याचाच नागरिक वापर करतात शिवाय या पाण्यामुळेरस्ता ही खराब झाला आहे.नियोजनाअभावी नागरिकांना वेळेवर पाणी न देऊ शकणार नगर पालिका प्रशासनाने जनतेच्या समस्या जर सोडलवल्या नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येणार असा इशारा मुख्याधिकारी यांना  निवेदनातून  मनसे सैनिक रितेश देशमुख यांनी दिला होता. मात्र अद्यापही शहरात सुरळीत स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्याने मनसे सैनिक रितेश देशमुख यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने यांच्या खुर्चीला हार घालून गढूळ पाण्याची बॉटल देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे सैनिक रितेश देशमुख  मनसे सैनिक उमेश टोलमारे, वैभव काळे, उदय जामकर,गजानन वैरागडे मनसे वाहतूक सेना जिल्हाउपाध्यक्ष ,मनविसे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, गजू धोंगडे, आदित्य इंगोले ,राजू खंदारे, दिलीप कव्हर ,बेबी ताई धुळधुळे, मनसे सैनिक  आबा सोनटक्के संतोष वानखेडे,  सुनील खेकाळे, रितेश पचपिल्ले,निखिल बुरकुले, आकाश खाडे, अमोल गाभने, बाळू विभूते,दिलीप कव्हर आणी ईतर मनसे सैनिक उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या