💥बारव पुनर्जीवन करण्यासाठी जिंतुरकर एकवटले जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी वर्गाचाही श्रमदानाला हात...!

 


💥1972 च्या दुष्काळाच्या वेळी जिंतूर कराना या बारावाचा मोठा आधार होता💥

जिंतूर प्रतिनिधी. /  बी.डी. रामपूरकर

जिंतूर करांचे वैभव असणारी मुख्य चौकातील बारव स्वच्छ करण्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते व महसूल, नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित आल्याचे चित्र पाहावयास मिळाले जिल्हाधिकारी अचल गोयल यांच्या हस्ते स्वच्छतेच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला येथील मेन रोड वरील बँकेच्या समोर असणारी पुरातन बारव जिंतूर करांचे वैभव होते 1972 च्या दुष्काळाच्या वेळी जिंतूर कराना या बारावाचा मोठा आधार होता कालांतराने शहर पाणीपुरवठ्यासाठी आद्यवत योजना कारवाई झाल्यानंतर या बाबीकडे दुर्लक्ष झाले.

यामध्ये अनेकांनी केर कचरा टाकला 2006 मध्ये या भागातील नागरिकांनी श्रमदानातून बाळू उपसली होती त्यानंतर पुन्हा ही बारव या भागातील नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे पूर्ण भरली होती संपूर्ण जिल्ह्यात बारव स्वच्छतेसाठी सेवाभावी कार्यकर्ते मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यातील बारवा स्वच्छ करण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेत आहे त्याचाच भाग म्हणून स्वच्छता अभियान चे मुख्य प्रवर्तक मल्हारी कात देशमुख यांच्या पुढाकारातून आज जिंतूर मध्येबारव स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात आले जिल्हाधिकारी,  आचल गोयल उपजिल्हाधिकारी अरुण जराड उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार तहसीलदार सखाराम मांडवगडे मुख्य अधिकारी रामदास कोकरे सुंदरलाल सावजी बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर उद्योजक ब्रिज गोपाल तोष्णीवाल प्राचार्य श्रीधर भोंबे एडवोकेट मनोज सारडा आशा खिल्लारे,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार गजानन वाघमारे अश्विन सोनवणे रवी सावजी कळमकर दिलीप देशपांडे सुभाष शर्मा रामचंद्र शर्मा बबनराव बेंडसुरे किशोर मोहारे स्वच्छता निरीक्षक सालेह चाऊस,  अशोक जगताप दत्ता तळेकर किशोर देशपांडे,नायब तहसीलदार ओमप्रकाश गोंड, प्रशांत राखे, दत्तात्रय देशमुख, गिरीश घिके, सुनील राठोड प्रा नारायण शिंदे, आदींची उपस्थिती होती

* भावी पिढीसाठी बारव ही नैसर्गिक देणगी :-

पुरातन काळातील नैसर्गिक स्त्रोत म्हणून कडे पाहिले जाते आज ह्या बारावी कचरे यांनी पूर्णपणे भरले आहे भावी पिढीला आपण अशा अस्वच्छ बारो दाखवणार आहोत का भावी पिढीला बारावीचे महत्त्व कळाले पाहिजे व हा नैसर्गिक स्त्रोत झोपतो आला पाहिजे यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी केले

* 31 मे रोजी जलपूजन :-

 या बारवा ची पूर्णपणे स्वच्छता करून या ठिकाणच्या जलस्त्रोत पूर्णपणे मोकळी करून 31 मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त जल पूजन कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी व्यक्त केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या