💥औरंगाबाद येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची बैठक संपन्न....!


💥या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरजी सुने यांची प्रमुख उपस्थिती💥

बातमी संकलन : शिवशंकर निरगुडे 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची औरंगाबाद  येथील जिल्हा बैठक औरंगाबाद येथील शासकीय विश्राम ग्रह शुभेदारी येथे ६ मे रोजी संपन्न झाली या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकार च्या समस्या वर चर्चा करण्यात आली त्या सोडविण्यासाठी संघटना शासन दरबारी पाठपुरावा करणार, जिल्ह्यातील संघटने मधील बाकी नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येतील व संघटने सोबत काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा. 


या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरजी सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान, केंद्रीय उपाध्यक्ष राजाभाऊ भुरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख, प्रदेश सरचिटणीस रवींद्र मेंढे, प्रदेश संपर्कप्रमुख बाबासाहेब सोरगीकर, दत्तप्रसाद अंबिलवादे प्रदेश संघटक , प्रदेश उपाध्यक्ष लिंबाजी बिडवे , शिवशंकर निरगुडे हिंगोली जिल्हा प्रसिद्धी प्रमूख औरंगाबाद जिल्हाध्यक्ष जगदीश बुलबुले ,संदीप इंगळे ,दिलीप शिंदे ,आबा बाविस्कर , विष्णू लघाणे , , अमोल भानुसे यांची उपस्थिती होती.या वेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे लिंबाजी बिडवे यांचा वाढ दिवस देखिल पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या