💥या उपोषणात प्रदेश कार्यकारिणी सदस्य सर्वश्री संतोष मुरकुटे, विठ्ठलराव रबदडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार💥
परभणी (दि.२२ मे २०२२) - ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या परभणी भाजपा व ओबीसी मोर्चाच्या वतीने उद्या सोमवार दि.२३ मे २०२२ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
या उपोषणात भाजपाच्या सर्व आघाड्यांचे सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे हे उपोषण आमदार मेघना दिदी बोर्डीकर,मा.आ.मोहन फड,जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
या उपोषणात प्रदेश कार्यकारिणी सदस्य सर्वश्री संतोष मुरकुटे, विठ्ठलराव रबदडे मामा,अँड व्यंकटराव तांदळे, रामप्रभू मुंढे,ओबीसी मोर्चाचे प्रदेश चिटणीस प्रदीप तांदळे, रामकिशन रौंदळे, अनंतराव गोलाईत आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सर्व आघाड्याचे जिल्हा पदाधिकारी व तालुकास्तरीय पदाधिकारी यांनी या लाक्षणिक उपोषणात सहभागी होऊन राज्यात ओबीसींना पुनश्च आरक्षण मिळविण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवतराव बाजगीर यांनी केले आहे....
0 टिप्पण्या