💥आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.धाराशिव वैजनाथराव शिराळे यांचा सत्कार....!


💥नागपुरात संपन्न झालेल्या शैक्षणिक परिषदेत सुप्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान💥

पुर्णा (दि.०९ मे २०२२) - तालुक्यातील ताडकळस येथुन जवळच असलेल्या फुलकळस गावचे सुपुत्र व नांदेड येथील सुप्रसिद्ध प्रा.धाराशिव शिराळे यांना नुकताच नागपुर येथे संपन्न झालेल्या शैक्षणिक परिषदेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे पाटील ,पप्पु पाटील भोयर ,प्रदीप सोळुंके सह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला होता. 

त्याचाच एक भाग म्हणून फुलकळस येथे दिनांक ०५ मे रोजी सायंकाळी एका कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार मराठी साहित्याचे अभ्यासक ,प्रवचनकार ,किर्तनकार ,नवोदित साहित्यिक तथा व्याख्याते प्रा.धाराशिव वैजनाथराव शिराळे यांचा अखिल भारतीय विरशैव युवक शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे व गंगाखेड विधानसभेचे विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते फुलकळस येथील ग्रामस्थ ,आजी-माजी लोक प्रतिनिधींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला .

यावेळी शिवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर ,गुट्टे काका मित्रमंडळाचे व्यंकटेश पवार ,फुलकळस येथील नवनिर्वाचित सोसायटी चेअरमन डिगांबर शिराळे ,सरपंच प्रतिनिधी विकास गव्हाळे ,वैजनाथराव शिराळे ,मा.सरपंच दत्तराव शिराळे ,ताडकळस मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर (स्वामी) ,कोषाध्यक्ष देवानंद नावकिकर ,फुलकळस ग्रामपंचायत सदस्य मन्मथ नावकीकर ,हरि मिसाळ ,मुख्याध्यापक दयानंद स्वामी ,मा.चेअरमन चक्रधर शिराळे यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या