💥पांगरी येथे लोकवर्गणीतून उभारलेल्या रामसेतू लोखंडी पुलाचे संदीप अप्पा लकडे यांच्या हस्ते लोकार्पण....!


💥सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह. भ.प. नारायण महाराज देवकर हे उपस्थीत होते💥 

जिंतूर प्रतिनिधी   / ‌बी.डी. रामपूरकर

 जिंतुर तालुक्यातील पांगरी येथील लहान नदी कडील शिवारातील शेतकऱ्यांना मागच्या बऱ्याचं वर्षांपासून पावसाळ्याच्या दिवसात पाण्याच्या प्रवाहामुळे ये जा करण्यास प्रचंड अडचण होत होती. कित्येक वेळेस महिलांना नदीच्या पलीकडेच रात्र रात्र राहण्याची वेळ आली. अशा त्रासाला कंटाळून सदरील पुलाची मागणी वेळोवेळी शेतकऱ्यांनी विविध राजकीय पुढाऱ्यांना केली. तसेच ग्रामपंचायत कडे या संदर्भात विनंती केली. परंतु कोणीच दखल घेत नसल्याचे लक्षात आल्या नंतर गावातील युवक मंडळींनी पुढाकार घेऊन सदरील पूल लोकवर्गणीतून करण्याचे ठरविले. नवयुवकाच्या जिद्दी च्या बळावर हे शिवधनुष्य पेलले. गावातील शेतकऱ्यानी लोकवर्गणी करून सदरील ठिकाणी लोखंडी पुलाची उभारणी केली. राजकीय उदासीनतेला सामाजिक ऐक्य, सहकाराची भावना आणि नवयुवकांतील जिद्द यांच्या बळावर आम्ही आमच्या हक्का साठी एक वटू शकतो हे दाखवून दिले. 

सदरील पुलाचे संदीपभाऊ लकडे यांच्या हस्ते वाजत गाजत लोकार्पण सोहळा पार पाडला. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह. भ.प. नारायण महाराज देवकर हे उपस्थीत होते प्रमुख उपस्थिती मा. श्री लक्ष्मनदादा बुधवंत ( अध्यक्ष ता. भा.ज.पा. जिंतुर ) मा. श्री अशोकदादा बुधवंत, श्री श्यामदादा बुधवंत (जिल्हाध्यक्ष जय भगवान बाबा महसंघ), प्रा. अंकुशराव बुधवंत, श्री दगडूसंत बुधवंत इ. उपस्थित होते तसेच वरील सर्वांनी सदरील कामास विशेष देणगी देली. सदरील पुलाची उभारणी करण्यासाठी 61 कुटुंबानी अर्थसाह्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक मंडळींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रम वेळी नवयुवकांना संदिपअप्पा लकडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गजानन आंबटवार यांनी केले. जगनाथ बुधवंत यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या