💥ॲड.बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त परळीत रक्तगट व सर्वरोग निदान शिबीर संपन्न...!


💥श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार💥     

परळी (दि.०९ मे २०२२) - श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत रक्तगट व सर्वरोग निदान शिबीर संपन्न तर आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.            याबाबत सविस्तर माहिती अशी की वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून काल दिनांक 09 /4/ 2022 रोजी वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा अध्यक्ष अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय शैलेश भाऊ कांबळे व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील सिद्धार्थ नगर येथे काल सर्वरोग निदान शिबिर व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाई आगळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम भाऊ साळवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या शिबिरात परळी शहरातील शंभर ते दोनशे जणांनी सहभाग नोंदवला याकामी श्री गीता जी चव्हाण रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी व अविनाश वावळे लॅब टेक्नीशियन यांनी सहकार्य केले तर आज परळी शहरातील जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या