💥पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध...!


💥सोसायटीच्या चेअरमन पदावर सुभाषराव बोकारे यांची तर व्हाईस चेअरमनपदी माधवराव पारटकर यांची निवड💥

पुर्णा (दि.२३ मे २०२२) - तालुक्यातील कान्हेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक आज सोमवार दि.२३ मे २०२२ रोजी बिनविरोध झाली असून सोसायटीच्या चेअरमन पदावर सुभाषराव बोकारे तर व्हाईस चेअरमन पदावर माधवराव पारटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

 यावेळी झालेल्या बैठकीत कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रुक्मीनबाई प्रकाशराव बोकारे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वासुदेवराव नवघरे, दादारावजी मोरे माजी चेरमन प्रल्हाद बोकारे शिवाजीराव मोरे प्रकाशराव बोकारे व सर्व सोसाइटी मेम्बर यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपास्थित होते...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या