💥पुर्णा तालुक्यातील कानखेड रेती घाटावरून रेती भरून सुसाट वेगाने धावणाऱ्या टिप्परने उडवली गरोदर शेळी...!


💥कानखेड येथील जिल्हा परिषद शाळे जवळील घटना : शेळी मालकाचे तब्बल २२ हजार रुपयांचे नुकसान💥

पुर्णा : तालुक्यातील मौ.कानखेड येथील रेती घाटावरून आपल्या टिप्पर मध्ये रेती भरून सुसाट वेगाने टिप्पर पळवणाऱ्या अनोळखी टिप्पर चालकाने जिल्हा परिषद शाळेजवळ एका गरोदर शेळीला उडवल्याने या शेळीसह तिच्या पिल्ल्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयविदारक घटना काल शुक्रवार दि.२७ मे २०२२ रोजी सायंकाळी ०६-५५ ते ०७-०० वाजेच्या सुमारास घडली या घटने नंतर सदरील टिप्पर चालक सुसाट वेगाने टिप्पर पळवत निघून गेला.

या घटनेत मृत्यू झालेली शेळी कानखेड येथील वाघमारे नामक ग्रामस्थाची असून या शेळीची किंमत जवळपास २२ हजार रुपयांच्या वर असल्याचे समजते कानखेड येथील रेती घाटावरून रेती भरलेले असंख्य रेती भरलेले टिप्पर रात्रंदिवस केवळ सुसाट वेगाने धावून ग्रामस्थांसह जनावरांच्याही जिवीतास धोका निर्माण करीत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित रेती घाटावरील सिसीटीव्ही कॕमेऱ्यांची तपासणी करून सायंकाळी  ०६-३० ते ०६-५५ या वेळेत रेती भरून गेलेल्या टिप्परांची पाहणी केल्यास संबंधित बेजवाबदार टिप्पर चालक निश्चितच पोलिसांच्या हाती लागेल यात तिळमात्र शंका नाही...    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या