💥परभणीत "जलसंधारण' चे विभागीय कार्यालय स्थापन करण्याची मागणी....!


💥शिवसेना आ.डॉ.राहुल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व जलसंधारण मंत्री गडाख यांच्याकडे केली मागणी💥

परभणी (दि.२६ मे २०२२) : परभणी येथे जलसंधारण विभागाचे स्वतंत्र जिल्हास्तरीय कार्यालय स्थापन करण्यात यावे अशी मागणी परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची मुंबईत भेट घेऊन केली आहे.

 जिल्ह्यामध्ये जायकवाडी, लोअर दुधना आणि येलदरी धरणाचे सिंचन क्षेत्र आहे,अन्य जलसंधारण प्रकल्प जिल्ह्यात असतानाही जलसंधारणा संबंधित परभणी जिल्ह्याचे कार्यालय मात्र जालना जिल्ह्याला जोडले गेले आहे  त्यामुळे जलसंधारण बाबतीत प्रश्न आणि कामा बाबत जालना येथे ये-जा करावी लागते येथील शेतकरी तसेच जलसंधारण विभागातील कर्मचारी यांना देखील वेळ आणि आर्थिक त्रास देखील होतो. हा त्रास ओळखून आमदार डॉ. पाटील यांनी परभणी येथे स्वतंत्र जलसंधारण कार्यालय करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे.

मंत्रालयात आमदार डॉ.पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.जलसंधारणचे कार्यालय परभणीत झाल्यास वेळ वाचेल व कामे लवकर होतील त्यामुळे आपण परभणीत जलसंधारण चे कार्यालय स्थापन व्हावे व सर्वांना होणारा त्रास वाचावा यासाठी पुढाकार घेतल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले, जलसंधारण कार्यालयासाठी कार्यकारी अभियंता उप अभियंता व अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे देखील तात्काळ भरावीत अशी मागणी देखील केल्याचे आमदार डॉ.पाटील म्हणाले या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देवून लवकरच परभणीत कार्यालय सुरू करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री व मंत्री गडाख यांनी दिले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या