💥गंगाखेड तालुक्यातील मौ.वझुर येथे रेती माफियांवर पोलिस प्रशासनाकडून धाडसी कारवाई....!


💥सहा.पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली कारवाई शेकडो ब्रास रेतीसह जेसीबी हायवा ट्रक्स आदी मुद्देमाल जप्त💥 

परभणी (दि.१३ मे २०२२) :- जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातील मौ.वझुर येथील गोदावरी नदीपात्रात जेसीबी मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर नियमबाह्य रेती उपसा करणाऱ्यांच्या विरोधात सहा.पोलिस अधिक्षक श्रेनिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड पोलिस प्रशासनाने काल गुरुवार दि.१२ मे २०२२ ते आज १३ मे रोजीच्या मध्यरात्री कठोर धाडसी कारवाई करीत जेसीबी मशीन,सेक्शन पंप अर्थात (बोट),हायवा,ट्रक्स, टिप्पर अशी तब्बल ४५ वाहनांसह हजारो ब्रास अवैधरित्या उत्खनन केलेली रेती जप्त केली दरम्यान या धाडसी कारवाईत तब्बल ९८ रेती तस्करांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात सर्वत्र मोठी खळबळ माजली आहे.

जिल्ह्याचे सहा. पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माने पोलीस उपनिरीक्षक सावंत व अन्य कर्मचारी यांच्या पथकाने गंगाखेड पासून उत्तरेस २५ किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीच्या पात्रात मध्यरात्री धाड टाकली त्यावेळी या नदीपात्रात काही बेकायदेशीर सेक्शन पंप (बोटी) तसेच जेसीबी मशीन द्वारे वाळूचा उपसा सुरू होता. हायवा,टिप्परद्वारे रेती येथून उचलून वाहतूक केली जात होती रेतीचा बेकायदेशीरपणे साठाही केला जात होता. या पथकाने चौकशी केल्या पाठोपाठ या बेकायदेशीर कृत्याबद्दल तेथील बोट,जेसीबी मशीन हायवा ट्रक अन्य वाहने जप्त केली. पाठोपाठ तेथील वाहनचालक वाहन मालक यांना सुद्धा ताब्यात घेतले. पोलिसांच्या या धाडसी कारवाईने रेती माफिया चांगलेच हादरले

दरम्यान गंगाखेड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक त्रिंबक शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ९८ जणांविरोधात बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहे.विशेष म्हणजे येथील गोदावरी नदी पात्रात या वाळू माफियांनी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नदीपात्रात दगड, गोटे,बाभळीची झाडे, टाकून बंधारा गुन्हा केला. त्याद्वारे पाणी अडवून बेसुमार वाळूचा उपसा सुरूच ठेवला होता. गंगाखेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत सात कोटी ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईने जिल्ह्यातील तालुका महसूल प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे.संपूर्ण जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर गोदावरी नदीच्या पात्रात पाथरी सोनपेठ गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्यात अहोरात्र शेकडो जेसीबी मशीन हायवा टिप्पर द्वारे वाळूचा उपसा सुरू आहे .महसूल प्रशासन आंतर्गत संबंधित तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी सुद्धा या वाळूच्या उपसा विरोधात दुर्लक्ष करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या