💥परभणी-पाथरी रस्त्यावरील पारवा शिवारातील जूगार अड्ड्यावर परभणी पोलिसांची धाड...!


💥पोलिस पथकाने टाकलेल्या धाडीत ४९ आरोपीसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त💥

 परभणी (दि.१९ मे २०२२) :  परभणी-पाथरी रस्त्यावरील पारवा शिवारातील एका जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांच्या विशेष पथकाने धाड टाकून जूगार खेळणार्‍या ४९ जुगारड्यांना ताब्यात घेत ३२ लाख ९२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची धाडसी कारवाई केली.

 परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना अप्पर पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधिक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरतोड यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या एका पथकाने मौजे पारवा शिवारात राष्ट्रमाता म.जिजाऊ सेवाभावी संस्था या ठिकाणी टीनच्या शेडमध्ये डी.एस. कदम हे पत्त्यावर जूगार खेळवत असल्याची माहिती मिळाल्या पाठोपाठ छापा टाकला. व त्या ठिकाणी पत्त्यावर जूगार खेळवितांना ४९ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीर्रट जूगार खेळण्याचे साहित्य, वाहन, मोबाई, रोख रक्कम असा एकूण ३२ लाख ९२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपींविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या