💥आदेश आला साहेबांचा अरे पक्षनिष्ठ म्हणून साहेब म्हणाले धर्मासाठी तुला हातात दगड-काठी घेऊन लढावेच लागेल ?

 


💥साहेबांच्या दावणीला बांधलेल्या मुक्या बैलापरी तुला शेवटपर्यंत राबराब राबावेच लागेल💥

कविता ; चौधरी दिनेश (रणजीत)

आदेश आला साहेबांचा अरे पक्षनिष्ठ म्हणून साहेब म्हणाले धर्मासाठी तुला हातात दगड-काठी घेऊन लढावेच लागेल ? धर्माच्या नावावर आमच्या सात पिढ्यांच्या उध्दाराठी तुला स्वतःच्या कुटुंबाला वेड्या वाऱ्यावर सोडावेच लागेल...!

पक्ष निष्ठेची दखल घेतील कधीतरी साहेब एक दिवस निश्चितच तुझ्या अरे पक्षवेड्या तोपर्यंत तुला प्रत्येक दंगलीत सहभाग नोंदवून गुन्ह्यांची माळ स्वतःच्या गळ्यात घालाविच लागेल...!!

साहेबांची मुल मोठमोठ्या शाळेत शिकून होतील डॉक्टर इंजिनियर नसता बापाच्या जागेवर पुढारी अरे त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी पुन्हा तुला तुझी मुल तुझ्यापरी गुलाम म्हणून कामाला लावावीच लागेल...!

पक्षनिष्ठ कट्टर कार्यकर्त्यांच्या रुपाने असंख्य दंगलखोर घडवून अनेक कुटुंब उध्वस्त जरी केली साहेबांनी तरी साहेबांच्या दावणीला बांधलेल्या मुक्या बैलापरी तुला शेवटपर्यंत राबराब राबावेच लागेल...!!

साहेबांच्या अपेक्षेपोटी तुला तुझ्या जन्मदात्या माय-बापाच्या अपेक्षा पायदळी तुडवून वडीलोपार्जीत संपत्ती विकून वकीलांची फिस अन् कोर्ट कचेरीचा खर्च तर भागवावाच लागेल...!

लायकी असून देखील तुझी तुला नालायक ठरवत साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेल्या धनदांडग्या सोनेरी गाढवालाही तुला अहोरात्र प्रचारात परिश्रम घेऊन निवडून आणत स्वतःची पक्षनिष्ठता सिध्द करावीच लागेल....!!

कविता ; चौधरी दिनेश (रणजीत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या