💥पुर्णा तालुक्यातील सर्वच रेती घाटांवर रेती उत्खननासाठी लिलावधारकांकडून बेकायदेशीर जेसीबी मशीनींचा वापर...!

 


💥तालुक्यातील असंख्य रोजमजूरांवर उपासमारीची वेळ ; महसुल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर निर्माण होत आहे प्रश्नचिन्ह💥


पुर्णा तालुक्यातील रेती घाट लिलावधारकांनी महसुल प्रशासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत रेती घाटांवर रेती उत्खननासाठी मनुष्य बळाचा वापर न करता बेकायदेशीरपणे रात्रंदिवस जेसीबी मशीनींचा वापर सुरू केल्यामुळे तालुक्यातील रोज मजुरांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्यामुळे अनेक रोजमजूर हाताला काम मिळविण्यासाठी शेजारील नांदेड जिल्ह्यात कामाच्या शोधात दरदर भटकतांना पाहावयास मिळत आहेत तर रेती घाट लिलावधारकांना लिलावावेळी जिल्हा प्रशासन व महसुल प्रशासनाने रेती उत्खननासाठी सकाळी ०६-०० ते सायंकाळी ०६-०० वाजेपर्यंत अर्थात सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत मनुष्यबळाचा वापर अर्थात रोजमजुरांचा वापर करून रेती उत्खनन करण्याचे कडक निर्देश नियमावलीतच दिले असतांनाही संबंधित रेती घाट लिलावधारक रेती घाटांवर रात्रंदिवस रेती उत्खननसाठी जेसीबी मशीनींचा वापर करीत असल्याचे व हजारो/लाखो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करून या रेती साठ्यांची शेकडो वाहनांतून तस्करीसह रेती घाट परिसरासह गावातील खाजगी भुखंडांवर तसेच आसपासच्या शासकीय गायरान जमिनीवर तसेच शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये रेतींची ढिगार रचत असतांना स्थानिक महसुल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी मात्र त्यांना खंबीर पाठबळ देत असल्यामुळे संबंधित रेती घाट लिलावधारक कमालीचे मुजोर झाल्याचे दिसत असून ते लोकप्रतिनिधींच्या विरोधालाही जुमानत नसल्याचे निदर्शनास येत आहे. 

💥तहसिलदार टेमकर उपविभागीय अधिकारी पाटील यांची भुमिका संशयास्पद :-


परभणी जिल्ह्यातील महसुल प्रशासनाच्या बेलगाम कारभारामुळे अधिकृत रेती घाट लिलावधारकांनी सर्वत्र धुमाकूळ माजवल्याचे दिसत असून यात पुर्णा,पालम,पाथरी ही तालुके सर्वात आघाडीवर असून लोकप्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारी नंतर देखील जिल्हाधिकारी तथा महसुल प्रशासनातील अधिकारी संबंधित रेती घाट लिलावधारकांनी चालविलेल्या मनमानी कारभारा विरोधात कारवाई करीत नसल्यामुळे संबंधित रेती घाट लिलावधारक रात्रंदिवस जेसीबी मशीनींचा वापर करीत नदीपात्रांवर दरोड्यावर दरोडे घालीत हजारो/लाखो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करीत या चोरट्या रेतीची सोईस्कररित्या विल्हेवाट लावत असतांना रेती घाट असलेल्या गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत सरपंच,तलाठी,मंडळ अधिकारी यांच्यासह तहसिलदार,नायब तहसिलदार मात्र.....आधा तुम्हारा आधा हमारा असे म्हणत कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसत असून पुर्णा तालुक्यातील कानखेड,कान्हेगाव,संदलापूर,पिंपळगाव बाळापूर,निळा या रेती घाटांवर संबंधित रेती घाट लिलावधारक खुलेआम जेसीबी मशींनींचा रात्रंदिवस खुलेआम वापर करीत एकाच इन्व्हाईसवर अर्थात रेती वाहतूक पासवर दिवसभर रेतीची वाहतूक करीत महसुल प्रशासनाच्या डोळ्यात पैश्याची धुळ झोकत लाखो रुपयांच्या महसुलावर अक्षरशः बुलडोजर चालवत असतांना उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून संबंधित रेटी घाट लिलावधारकांवर कठोर कारवाईचे अस्त्र उगारण्यास का मागेपुढे पाहत आहेत ? असा प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्या या भुमीकेमुळे त्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

💥तालुक्यातील सर्वच रेती घाटांची ईटीएसद्वारे मोजनी अत्यावश्यक :-


पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रांवरील फेब्रुवारी महिण्यात लिलाव झालेल्या मौ.कानखेड,पिंपळगाव बाळापूर,संदलापूर आदी रेती घाटांवर संबंधित रेतीघाट लिलावधारकांनी रेती उत्खननासाठी रात्रंदिवस जेसीबी मशीनींचा वापर करीत लिलावातील ठराविक रेती साठ्याच्या हजारो/लाखोपट रेतीचे उत्खनन केल्यामुळे नदीपात्राची अक्षरशः खरडपट्टी झाल्याचे निदर्शनास येत असून कानखेड रेतीघाट लिलावधारक अनिल अग्रवाल यांनी कानखेड रेतीघाटावर महसुल प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवत अवैधरित्या जेसीबी मशीनचा वापर करीत प्रचंड धुमाकूळ घातला असतांना पुन्हा मौ.निळा रेती घाट लिलावात अग्रवाल यांना सुटल्यामुळे या निळा रेतीघाटावर थृवदेखील जेसीबी शीनींचा वापर करण्यास सुरूवात केली असून अवघ्या तिन ते चार दिवसात या रेतीशघाटावर जेसीबी मशीनच्या साहाय्याने हजारो ब्रास रेतीचे उत्खनन करण्यात आल्यामुळे मौ.कानखेड,मौ.निळा,पिंपळगाव बाळापूर,मौ.कान्हेगाव,संदलापूरसह तालुक्यातील सर्वच रेती घाटांची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ईटीएसद्वारे मोजणी करून संबंधित रेतीघाट धारकांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे व अमानत रक्कमाही जप्त करण्यात याव्या व बेकायदेशीर अतिरिक्त उत्खनन प्रकरणी संबंधित गावातील ग्रामविकास अधिकारी/सरपंच,तलाठी मंडळ अधिकारी यांच्यासह तहसिलदार यांना देखुल जवाबदार धरून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या