💥पुर्णा तालुक्यातील खडाळा येथील प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे यांचा गौरव...!


💥त्यांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड,मा.पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर,आयोजक आनंद भरोसे यांच्या हस्ते पुरस्कार💥

धानोरा काळे/प्रतिनिधी

परभणी येथे संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने स्व.ॲड.शेषरावजी धोंडजी भरोसे ( आबा ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दुसऱ्यांदा भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन “कृषी संजीवनी महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात  खडाळा (ता.पूर्णा) येथील  प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर बाबाराव शिंदे यांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री  डॉ.भागवत कराड, माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आयोजक आनंद भरोसे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या