💥पुर्णा तालुक्यातील जेष्ठ पत्रकार शेख पाशा शेख फरीद यांचे दिर्घ आजाराने निधन...!


💥त्यांच्या पश्चात पत्नी तिन मुल तिन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे💥

पुर्णा (दि.१४ मे २०२२) पूर्णा येथील जेष्ठ पत्रकार तथा दैनिक गावकरीचे तालुका प्रतिनिधी शेख पाशा शेख फरीद याचे आज शनिवार दि.१४ मे २०२२ रोजी सकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास दिर्घ आजाराने दुःखद निधन असुन त्यांचा अंत्यविधी आज शनिवार दि.१४ एप्रिल रोजी सायंकाळच्या नमाज नंतर ०५-३० वाजेच्या सुमारास येथील मुस्लीम दफनभुमीत होणार आहे.

आपला मनमिळावू स्वभाव व जनहीतवादी पत्रकारीतेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे जेष्ठ पत्रकार शेख पाशाभाई यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी तिन मुल तिन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे....

इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो....अशी इश्वरा चरणी प्रार्थना.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या