💥रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या घोषणेला 15 दिवस उलटले तरीही कुठलीच हालचाल नसल्याने प्रवासी वर्गात संताप💥
परभणी / प्रतिनिधी
मराठवाड्यातुन धावणाऱ्या नांदेड - हडपसर एक्सप्रेसचा विस्तार पुणे पर्यंत करून सात दिवसात ती गाडी दररोज धावणार अशी घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणीत केली होती परंतु 15 दिवस उलटले तरीही कुठलीच हालचाल नसल्याने प्रवासी वर्गात संताप व्यक्त झाला आहे.
7 मे रोजी परभणीत आलेल्या रेल्वे राज्यमंत्री यांची रेल्वे प्रवाशी महासंघाचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नी साकडे घातले होते त्या वेळी ना. दानवे यांनी येत्या सात दिवसात दररोजच्या नांदेड-पुणे गाडीची घोषणा केली परंतु अजून तरी देखील पुणे रेल्वे सुरू झाली नाही. आज ना. दानवे यांच्या कार्यलयात प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क करून ना. दानवे यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देण्यात आली त्यांना एक निवेदन पाठवण्यात आले असून त्यात म्हटले अशे की सध्या परभणी/नांदेड ते पुणे प्रवासाला खासगी मालकाने लूट चालविली आहे. ट्रावेल्स मालकांचा लाभ पोहोचण्यासाठी मुद्दामहून नांदेड-पुणे रेल्वे ला उन्हाळी सीजन संपेपर्यंत सुरू न करण्यासाठी खटाटोप नांदेड आणि सिकंदरबाद येथील अधिकारी करीत आहेत. ह्याचा लाभ घेऊन ट्रावेल्स मालकानी नांदेड/परभणी ते पुणे टिकट ५००-६०० ऐवजी १५००-२००० रूपया प्रमाणे सर्रास पणे वसूल करण्यात मग्न आहेत.
भारतभर प्रत्येक विभागात प्रवाश्यांच्या मागणी प्रमाणे विभागातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या जनप्रिय रेल्वे गाड्यांना प्राथमिकता देऊन सुरू केली जाते. मात्र नांदेड विभागात मे महिना संपताना देखील प्रवाश्यांच्या सोयीनुसार एकही उन्हाळी विशेष रेल्वे नाही. विभागातील प्रवाश्यांनी कधी न ऐकलेली, इथल्या प्रवाश्यांना काहीच संबंध नसलेल्या गाड्यांना बळजबरीने प्रवाशांच्या माथी मारण्यात येत आहेत. नांदेड विभागाच्या महाप्रबंधकांपासून सर्व अधिकारी तुघलकी कारोबार करत आहेत. भर उन्हाळी सीजनात देखील प्रवाश्यां समोर अनंत अडचणी निर्माण केल्या जात आहेत. सध्या मराठवाडा विभागातील सर्व रेल्वे गाड्यांना न भूतो न भविष्यती अशी गर्दी होत आहे. एकीकडे प्रवाशी जनता त्राही त्राही करत असतांना दूसर्या बाजूला दक्षिण-मध्य रेल्वे अधिकारी तानाशाही प्रवृत्तीने मिरवत आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात दररोज एक-दोन नवीन रेल्वे सुरू करतांना मराठवाडा विभागात मात्र उपलब्ध असलेल्या गाड्यांना देखील रद्द ठेवलेले आहे. गोर गरीबांचे एकमेव प्रवाशी साधन असलेल्या सर्व सवारी गाड्यांना रद्द करून ठेवले आहेत.
परभणी ते मुदखेड दरम्यान दोहेरीकरण मार्ग असताना एकेरी मार्गाचा वेळापत्रक प्रमाणे लूज टाईम देऊन चालविण्यात येत आहेत. दोहेरी मार्ग असताना नांदेड-पनवेल रेल्वेला चुडावा स्थानकावर दररोज अर्धा ते एक तासांपर्यंत उभे करतात. निजामाबाद-पंढरपूर, पूर्णा-हैदराबाद, औरंगाबाद-हैदराबाद, पूर्णा-अकोला, परळी वैजनाथ-अकोला सवारी गाड्यांना जलद रेल्वे त परिवर्तीत असताना सवारी गाड्यां प्रमाणे दर तासी २५ ते ३० किमी गतीने निश्चित करून सर्व स्थानकावर उभे करतात, टिकट दर मात्र दोन पटीने वसुली केली जात आहे. इंजिन बदलण्याची नावाखाली नांदेड-पनवेल, निजामाबादं-पंढरपूर, नागपूर-कोल्हापूर, नांदेड-बेंगलूरू, पूर्णा-हैदराबाद, औरंगाबाद-हैदराबाद गाड्यांना परळी वैजनाथ आणि लातूर रोड स्थानकावर एक-एक तासांपर्यंत अडविण्यात येत आहेत.
माननीय रेल्वे मंत्र्यांनी वरील सर्व मागण्यांचे महत्व ओळखून तत्काळ नांदेड-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यासोबत रेल्वे चा इतर सर्व मागण्यांचे पूर्तता करावे ही मागणी या निवेदनात मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डाॅ राजगोपाल कालानी, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, रूस्तुम कदम, दयानंद दीक्षित, कादरीलाला हाशमी, वसंत लंगोटे, कोंडिबा जाधव, दत्ता गिरी महाराज, इत्यादीने केली आहे....
0 टिप्पण्या